‘सिंहीण अचानक पार्टीत आणि…’, जीव वाचवण्यासाठी माणूस थेट चढला झाडावर

फिरायला जात असताना अचानक आपल्या समोर एक प्राणी आल्यास आपला जीव घाबरतो. मात्र सिंह, वाघ किंवा यांसारखे अन्य प्राणी समोर आल्यास त्याला बघताच क्षणी अनेकांनी तेथून पळ काढला, तर बऱ्याच जणांना हृदयविकाराचा झटका आला आहे.

फिरायला जात असताना अचानक आपल्या समोर एक प्राणी आल्यास आपला जीव घाबरतो. मात्र सिंह, वाघ किंवा यांसारखे अन्य प्राणी समोर आल्यास त्याला बघताच क्षणी अनेकांनी तेथून पळ काढला, तर बऱ्याच जणांना हृदयविकाराचा झटका आला आहे. अशीच एक घटना घडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक सिंहीण अचानक पार्टीमध्ये आल्याचे दिसते. (lioness shocking video man climbing a tree saving himself from a lioness)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पार्टी सुरू असताना एक सिंहीण अचनाक त्या पार्टीमध्ये येते, त्यानंतर सर्व जण आपला जीव वाचवण्यासाठी धाव घेतात. तसेच, एक माणूस त्या सिंहणीला पाहताच थेट झाडावर चढतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lions Habitat🦁 (@lions.habitat)

मिळालेल्या माहितीनुसार, एका संबंधीत व्यक्तीने त्या सिंहीणला डिवचले होते. त्यामुळे संतापलेल्या सिंहणीने त्याचा पाठलाग केला. संतापलेल्या सिंहीणीला पाहून तो व्यक्ती थेट झाडावर चढला. त्यानंतर सिंहीणही आपल्या पंजाच्या सहाय्याने त्या झाडावर चढते. त्यावेळी झाडावर चढणारा माणूस स्वत:ला वाचवण्यासाठी सिंहिणीच्या तोंडावर सतत लाथ मारताना दिसतो.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो पाहून लोकांना भीतीमुळे वाईट वाटू लागले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.


हेही वाचा – ‘रस्ता सुरक्षा मोहिमे’साठी दिल्ली पोलिसांनी घेतला पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा आधार