घरदेश-विदेशयुरेका ! मंगळावर बर्फाच्या स्वरूपात पाणी

युरेका ! मंगळावर बर्फाच्या स्वरूपात पाणी

Subscribe

मंगळावर भूगर्भात पाण्याचे सरोवर सापडले आहे. त्यामुळे संशोधनाच्या दृष्टीने आता हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. इटालियन संशोधकांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले.

मंगळावर जीवसृष्टी होती का? मंगळवार मानवी वसाहत शक्य आहे का? या प्रश्नांची उत्तरे आता लवकरच मिळतील. कारण मंगळावरील भूगर्भात पाण्याचे साठे सापडले आहेत. त्यामुळे तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मंगळावरील जीवसृष्टी होती का? आहे का? किंवा मंगळावरील जीवसृष्टीच्या संशोधनाच्या दृष्टीने पाण्याचे मिळालेले पुरावे हे महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. मंगळावरील बर्फाच्या थराखाली २० किलो मीटर व्यासाचे तळे असल्याचा दावा इटालियन संशोधकांनी म्हटले आहे. युरोपीय स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस ऑर्बिटर यानावरील रडारने हा शोध लावला आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये यासंदर्भातील संशोधन करण्यात आले. सायन्स या नियतकालीकामध्ये यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. मंगळावर सापडलेला पाण्याचा हा सर्वात मोठा प्रदेश आहे. या साठ्यामध्ये पाणी कमी प्रमाणात नसून ते भरपूर प्रमाणात असावे असे ऑस्ट्रेलियातील स्विनबर्न विद्यापीठाचे प्राध्यापक अॅलन डफी यांनी म्हटले आहे.

मंगळावरील पाणी कोणत्या स्वरूपात?

मंगळावर सापडलेले सध्याचे पाणी हे बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे. पण, ते पिण्यायोग्य नाही. त्यामुळे सध्या वैद्यानिक पिण्यायोग्य पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. आत्ता सापडलेले बर्फ रूपातील पाणी हे दीड किलोमीटर खाली आहे. त्यामध्ये सुक्ष्मजीव असण्याचा अंदाज देखील वर्तवला जात आहे. मात्र, काही वैज्ञानिक तळ्यातील पाण्यामध्ये क्षार, खनिजयुक्त पाण्यात सजीव आहेत किंवा नाही याबद्दल साशंक आहेत. पण एक गोष्ट मात्र खरी की या शोधामुळे मंगळावर जीवसृष्टी सापडण्याची शक्यता वाढली आहे.

- Advertisement -

मिशन ‘मार्स’

मंगळावरील वातावरण आणि जीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी नासा आणि इस्त्रोने देखील आपआपली याने अंतराळामध्ये पाठवली आहेत. भविष्यामध्ये देखील अनेक देश यामध्ये उतरणार आहे. सध्या या यानांच्या साथीने मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळावरील बर्फाच्या स्वरूपात सापडलेले पाणी हे यापुढील संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -