Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Liquor price in up: यूपी सरकारने दारूवर आकारला कोरोना सेस; दारूच्या किंमतीत...

Liquor price in up: यूपी सरकारने दारूवर आकारला कोरोना सेस; दारूच्या किंमतीत वाढ

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेश सरकारने पुन्हा दारूच्या किंमती वाढवल्या आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे होणाऱ्या महसुली तुटवडा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा नव्या धोरणात बदल केला आहे. या दुरुस्तीनंतर यूपीमधील दारू १० रुपये ते ४० रुपयांपर्यंत महाग झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान असलेल्या लॉकडाऊनचा फटका आता मद्यपींना चांगलाच बसणार आहे.

कोरोनामुळे, उत्तर प्रदेशात लागू करण्यात आलेल्या साप्ताहिक निर्बंधांसह मिनी लॉकडाऊनचा परिणाम आता सरकारच्या महसुलावर दिसून येत आहे. दरम्यान, दारूची विक्री कमी झाल्यामुळे सरकारला तोटा होत आहे. आता हा तोटा भरून काढण्यासाठी सरकारने दारूची किंमत महाग केली आहे. म्हणजे दारूच्या किंमतीवर कोरोना उपकर (कोरोना सेस कर) लागू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना शनिवार व रविवारसह लॉकडाऊनच्या कालावधीत देखील वाढ करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी उत्पादन शुल्क २०२१-२०२२ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार आता दारूच्या किंमती वाढून १० रुपये ते ४० रुपयांपर्यंत महाग झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या काळात सरकारने कोरोना सेस लागू केला होता. या एप्रिलमध्ये हा सेस रद्द करण्यात आला होता, परंतु पुन्हा एकदा सेस लावण्याचा निर्णय सरकार कडून घेण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेसर प्रकारातील ९० एमएल दारू आता १० रुपयांनी महाग होणार आहे. तसेच प्रीमियम प्रकारातील दारूमध्येही १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

असे असतील दारूचे नवे दर

सुपर प्रीमियमच्या ९० मिलीवर २० रुपये, स्कॉचवर ३० रुपये आणि विदेशी दारूवर ४० रुपये अतिरिक्त सेस लावण्यात आला आहे. यासंदर्भात सरकारनेही आपला आदेश जारी केला आहे.

- Advertisement -