घरदेश-विदेशLiquor Policy Case : केजरीवाल यांच्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार?

Liquor Policy Case : केजरीवाल यांच्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार?

Subscribe

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून गुरुवारी (21 मार्च) अटक करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी विशेष न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. तसेच आपचे सरकार असलेल्या पंजाबमध्येही मद्य धोरण प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे (BJP) पंजाब युनिटचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी शुक्रवारी सांगितले की, पंजाबमधील मद्य धोरणप्रकरणी सखोल ईडी चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही अटक केली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Liquor Policy Case After Arvind Kejriwal arrest hangs on the Chief Minister of Punjab)

हेही वाचा – ED : ईडी कमालीची सक्रीय; विरोधी नेत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या घरांवर छापेमारी

- Advertisement -

पंजाबमधील मद्य धोरणप्रकरणी यापूर्वी तीन अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यामध्ये वित्त आयुक्त (अबकारी) के.ए.पी. सिन्हा, वरुण रुजम व नरेश दुबे यांचा समावेश आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांनी 2022 मध्ये पंजाबमधील मद्य धोरण तयार केले होते. तसेच या धोरणांतर्गत पंजाबमध्ये मद्यविक्रीसाठी घाऊक परवाने (L1) मिळालेल्या दोन कंपन्यांचे प्रवर्तक दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यातही आरोपी आहेत. विशेष म्हणजे पंजाबमधील धोरण ठरविताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी वरुण रुजम व नरेश दुबे हे दोन्ही अधिकारीही उपस्थित असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा नंबर लागतो का? हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Kolhapur Constituency : शाहू महाराजांना ‘वंचित’चा पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

- Advertisement -

आप पक्ष सत्तेचा भुकेला

दरम्यान, भाजपा पंजाब युनिटचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी पत्रकारांना सांगितले की, ज्या उत्पादन शुल्क धोरणाखाली दिल्लीतील अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकले आहे, तेच उत्पादन शुल्क धोरण केजरीवाल आणि भगवंत मान यांनी पंजाबमध्येही लागू केले आहे. आता केजरीवाल यांना अटक झाली. त्याप्रमाणेच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही अटक होऊ शकते. पंजाबमधील आम आदमी पक्षाने उत्पादन शुल्क धोरण नावाने राज्यातील जनतेचे हजारो कोटी रुपये लुटले आहेत. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांनी लगेचच राजीनामा द्यायला हवा होता, मात्र केजरीवाल हेच मुख्यमंत्री राहतील असे त्यांच्या पक्षाचे नेते सांगत आहेत. यावरून असे दिसून येते की, आप प्रमुखांचा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर विश्वास नाही आणि पक्ष सत्तेचा भुकेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -