LockDown: उद्यापासून ‘या’ राज्यात काही तासांसाठी दारूची दुकाने सुरू!

liquor shops in assam to open for limited hours from monday amid coronavirus lockdown

देशात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. अनेक राज्यात लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे. दरम्यान आसाम सरकारने सोमवारपासून काही तासांसाठी दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, आसाममध्ये सरकारी आदेशानुसार सोमवारपासून काही तासांसाठी दारूची दुकाने आणि बाटल्या भरण्याचे काम सुरू ठेवणार आहेत. आतापर्यंत आसाम मध्ये २९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे दारूसाठी जम्मूमध्ये लॉकडाऊनदरम्यान एका अज्ञाताने दारूची चोरी केल्याची घटना घडली आहे. रविवारी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, हे दारूचे दुकान शहराच्या मध्यमागी असलेल्या आम्फळा चौकात आहे. या आरोपींने दुकानामागील भिंत तोडली. याबाबत आम्हाला आज सकाळी समजले. अजून या दारूच्या दुकानातून किती बाटल्या आणि किती रक्कम चोरली गेली आहे. याबाबत माहित झालं नसून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – CoronaVirus: पोलीसाने जिल्हाधिकाऱ्याला लॉकडाऊनचे दिले धडे!