घरCORONA UPDATEBreaking: तळीरामांसाठी गुड न्यूज; वाईन्स शॉप, पान टपऱ्या सुरु होणार

Breaking: तळीरामांसाठी गुड न्यूज; वाईन्स शॉप, पान टपऱ्या सुरु होणार

Subscribe

भारतातील असंख्य नागरिक ज्या निर्णयाची वाट पाहत होते. तो निर्णय अखेर सरकारने घेतला आहे. वाईन्स शॉप कधी सुरु करणार? हा एकच प्रश्न देशातल्या तळीरामांना भेडसावत होता. तर आता वाईन्स सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रीन झोनमध्ये वाईन्स आणि पान टपऱ्या सुरु करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार वाईन्स शॉपना परवानगी देण्यात आली आहे. मात्र ग्रीन झोनमध्येच ही परवानगी असणार आहे. तसेच वाईन्समधून खरेदी करण्यासाठी काही नियमावली घालून दिली आहे. दुकानात एकावेळी फक्त ५ लोकांनाच उभे राहण्याची परवानगी असेल. तसेच दोन गिऱ्हाईकांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे लागणार आहे.


Lockdown Breaking: आता रेड झोनमध्येही दारू विक्रीला परवानगी

दरम्यान मॉल्स आणि मार्केटिंग कॉम्प्लेक्स मधील वाईन्स शॉप्सना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या व्यतिरीक्त इतर ठिकाणी असलेल्या दुकांना परवानगी देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन आता १७ मे पर्यंत वाढवले असले तरी यादरम्यान ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी ही दुकाने चालू करता येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -