Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Liquor Price Hike: 'या' राज्यात आजपासून दारूचे दर वाढणार

Liquor Price Hike: ‘या’ राज्यात आजपासून दारूचे दर वाढणार

Related Story

- Advertisement -

तळीरामांना मद्यप्राशन करताना आता थोडासा विचार करावा लागणार आहे. कारण पुद्दुचेरी सरकारने दारूच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या मते, येथील दारूचे वाढलेले दर आजपासून लागू करण्यात येणार आहेत. दरम्यान, तामिळनाडू आणि कर्नाटकसह इतर अनेक राज्यांच्या तुलनेत येथे मद्याच्या किंमती फारच कमी आहेत. पुद्दुचेरीची अर्थव्यवस्था ही मुख्यतः पर्यटनावर अवलंबून असते. हे लक्षात घेऊन यावर्षी एप्रिलमध्ये पुद्दुचेरी सरकारने दारूवरील विशेष कोविड कर रद्द केला होता. यानंतर या केंद्रशासित प्रदेशातील दारूचे दर कमी करण्याची परवानगी देण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष उत्पादन शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. ७ एप्रिल रोजी उपराज्यपाल तामिलीसाई सुंदरराजन यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. यानंतर या राज्यातील दारूची किंमत खूप कमी झाल्याचे बघायला मिळाले होते. विशेष उत्पादन शुल्क रद्द करताना उपराज्यपाल यांनी सर्व पब, दारूची दुकाने आणि रेस्टॉरंट्सला सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले होते. तसेच निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर विशेष कर मागे घेण्यात आले होते. पण राज्य सरकारने आता पुन्हा एकदा किंमत वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

…म्हणून विशेष उत्पादन शुल्क लागू केले

- Advertisement -

कोरोना महामारीच्या वेळी विशेषत: तामिळनाडूकडून पद्दुचेरीला कमीत कमी लोकांना येता येईल, हे लक्षात ठेवून पद्दुचेरी सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यात दारूवरील हे विशेष उत्पादन शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर येथे दारूची किंमत शेजारील राज्यांइतकीच झाली असल्याचे सांगितले जात आहे.


पोखरणमध्ये सैन्याला भाजीपाला पुरवठा करणारा निघाला ISI दहशतवादी संघटनेचा हेर

- Advertisement -