रिक्षाला वेग अनावर, टर्न घेताना चिमुकला पडला रस्त्यावर; व्हिडीओ व्हायरल

वाहन चालवताना वेग मर्यादा पाळण्याच्या सूचना वारंवार वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) केल्या जातात. मात्र या सुचनांकडे सातत्याने वाहतूक चालकांकडून दुर्लक्ष केले जाते. परिणामी अनेकांना रस्ते अपघातात (Road Accident) आपला जीव गमवावा लागतो.

Road Accident

वाहन चालवताना वेग मर्यादा पाळण्याच्या सूचना वारंवार वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) केल्या जातात. मात्र या सुचनांकडे सातत्याने वाहतूक चालकांकडून दुर्लक्ष केले जाते. परिणामी अनेकांना रस्ते अपघातात (Road Accident) आपला जीव गमवावा लागतो. असाच काहीसा प्रकार घडल्याचा एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. तसेच प्रशासकीय सेवा अधिकारी अवनीश शरण यांनीही ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रिक्षामध्ये आईच्या मांडीवर बसलेला मुलगा अचानक खाली पडल्याचे दिसत आहे. (little boy fall from rickshaw on road video viral)

मिळालेल्या माहितीनुसार, ही व्हायरल व्हिडिओ उत्तराखंडमधील काशीपूरचा असल्याचे समजते. सीपीयूचे कर्मचारी सुंदर लाल इथे असलेल्या चीमा चौकात वाहतूक व्यवस्था हाताळत होते. इतक्यात समोरून येणाऱ्या कारला ओव्हरटेक करत असताना ई-रिक्षाचालकाने रिक्षा जोरात वळवली.

हेही वाचा – ‘या’ गोलंदाजाची अॅक्शन पाहून होईल लगान चित्रपटाची आठवण; व्हिडीओ व्हायरल

त्यावेळी आईच्या (Mother) मांडीवर बसलेला चिमुकला मुलगा रस्त्यावर पडला. त्यानंतर खाली पडलेल्या मुलाच्या मागून बस येत होती. ही बस पाहून गस्तीवर असलेल्या सुंदरलाल यांनी मुलाला रस्त्यावरून उचलले आणि त्याचा जीव वाचवून त्याला त्याच्या आईकडे दिले.

हेही वाचा – ‘दिस इज यू, दिस इज मी…’ दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे नवे रील व्हायरल

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट आतापर्यंत 1.4 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, 78 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. लोक या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.


हेही वाचा – काहींचा समाजात तेढ पसरवण्याचा प्रयत्न; कारवाईबाबत पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा – गृहमंत्री