घरदेश-विदेश...आणि घशात अकडलेला जीवंत मासा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढला!

…आणि घशात अकडलेला जीवंत मासा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढला!

Subscribe

केरळमधील एका ६० वर्षीय वृद्धाच्या घशात जीवंत मासा अडकल्याने जवळपास तासभर त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर त्या माणसाच्या घशातून अडकलेला मासा काढण्यात आला. हा धक्कादायक प्रकार केरळच्या चवक्कड येथील थ्रिसूरमधील कृष्णन या ६० वर्षीय यांच्यासोबत घडला. कृष्णन हे घराजवळील समुद्रात मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांच्या घशात जीवंत मासा अडकला.

नेमकं काय घडलं

कृष्णन यांनी एक छोटासा मासा पकडला आणि दुसरा मासा पकडण्याची लगबग सुरू केली. पकडलेला मासा त्यांनी दाताखाली धरून ठेवला. ज्यामुळे त्याचे दोन्ही हात इतर मासे पकडण्यासाठी मोकळे झाले. मात्र दातात पकडलेला मासा निसटून त्यांच्या घशात जाऊन अडकला. कृष्णन यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यामुळे ते मदतीसाठी हातवारे करू लागले. काही लोकं त्यांची अवस्था पाहून धावत आले. मात्र त्यांना समजले नाही की नेमकं कृष्णन यांना झाल तरी काय. त्या लोकांनी कृष्णन यांना मोटरसायकलवरून हॉस्पिटलमध्ये आणले.

- Advertisement -

जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले तेव्हा फक्त माशाची शेपटी दिसत होती. कृष्णन यांची अवस्था खुपच बिकट झाली होती. त्यांच्या घशात मासा खुप आत जाऊ अडकला होता. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता, अशी माहिती डॉ. अर्जुन जी. मेनन यांनी दिली. अशा परिस्थितीत माणसाचा ब्रेन डेड होण्याची शक्यता असते. मात्र या प्रकरणात हा मासा जीवंत असल्यामुळे घशात वळवळ करत असल्याने या केसमध्ये ब्रेन डेड होण्याची शक्यता नव्हती, असेही डॉक्टर म्हणाले. हा मासा घशातून काढणे खुपच कठिण होते. कृष्णन यांना तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आले. अखेर डॉक्टरांना तो मासा जीवंतच घशातून बाहेर काढण्यात यश आले. ही शस्त्रक्रिया जवळपास एक तास सुरू होती.

हेही वाचा –

Coronavirus: आज ३९४ नवीन रुग्ण, तर १८ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -