Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश रेप, टॉर्चर, मर्डरचे लाईव्ह व्हिडीओ, रशियात विकृत यू ट्यूबरर्सचा ट्रेंड

रेप, टॉर्चर, मर्डरचे लाईव्ह व्हिडीओ, रशियात विकृत यू ट्यूबरर्सचा ट्रेंड

यूट्यूबवरून पैसा कमावण्यासाठी रशियातील काही विकृतांनी मानवतेच्या सर्व सीमा ओलांडल्या असून लाईव्ह रेप, टॉर्चर, मर्डरचे व्हिडीओ यूटयूबवर पोस्ट करून पैसे कमावण्याचा नवीन ट्रेंड सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे जगभरात अनेकजणांच्या नोकऱ्या गेल्या तर नैराश्यामुळे काहीजणांचे मानसिक स्वास्थच ढासळले आहे. त्यातही आता जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे पुन्हा एकदा आर्थिक संकट घोंघावू लागले आहे. यामुळे मिळेल त्या मार्गाने झटपट पैसा व प्रसि्दधी मिळवण्याकडे नागरिकांचा कलही वाढत आहे. त्यातही गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाचेही क्रेझ वाढले आहे. या माध्यमातून प्रसिद्धी आणि पैसा मिळवता येतो. यामुळे यूट्यूबवरून पैसा कमावण्यासाठी रशियातील काही विकृतांनी मानवतेच्या सर्व सीमा ओलांडल्या असून लाईव्ह रेप, टॉर्चर, मर्डरचे व्हिडीओ यूटयूबवर पोस्ट करून पैसे कमावण्याचा नवीन ट्रेंड सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे रशियामध्ये ही विकृत मानसिकता असणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. डिसेंबर २०२० मध्ये रशियातल्या एक यूट्यूबर ‘स्टेस रिफेली’ याच्यावर गर्लफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. स्टेसने कडाक्याच्या थंडीत गर्लफ्रेंडला विवस्त्र अवस्थेत बाल्कनीत कोंडून ठेवले होते. यामुळे थंडीत गारठून तिचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे स्टेसने या घटनेचा यूटयूबवर लाईव्ह व्हिडीओ स्ट्रीम केला होता. त्या व्हिडीओला लाखो व्हयूज तर मिळालेच पण त्यादुप्पट त्याला लाईक्सही मिळाले व व्हिडीओ शेअरही झाला.

- Advertisement -

त्यानंतर एका गर्भवती महिलेलाही अशाच पद्धतीने यूट्यूबवर लाईव्ह व्हिडीओ करत ठार करण्यात आले. याघटनेच्या काही दिवसांनंतर एका भिकाऱ्याला रस्त्यावरच जिवंत पेटवण्यात आले व त्या घटनेचाही व्हिडीओ यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात आला. या घटनांमुळे रशियातच नाही तर जगात खळबळ उडाली आहे.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी एका महिलेचे डोके टेबलावर आपटून तिला ठार करण्यात आले. त्या हत्येचा व्हिडीओही लाईव्ह करण्यात आला होता. रशियात असे कौर्याचे लाईव्ह व्हिडीओ करण्याचा ट्रेंडच आला असून सरकारचीही चिंता वाढली आहे. कोणती व्यक्ती केव्हा कोणाचा जीव घेईल आणि प्रसंग लाईव्ह करेल सांगता येत नाही. यामुळे सरकारच नाही तर सायबर पोलिसांचीही झोप उडाली आहे.

- Advertisement -

अनेक यूटयूबर यात सक्रिय असून नुकतेच एका तरुणाने इमारतीमध्ये घुसून एका महिलेला ड्रग्ज देऊन तिच्यावर रेप केला. त्याचे त्याने यूटय्ूबवर लाईव्ह स्ट्रीम केले.विशेष म्हणजे यूट्यूब अनेकवेळा अशा प्रकारचे व्हिडीओ स्ट्रीम ब्लॉक करते. पण हॅकर्स व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक माथेफिरू यूट्यूबचा ब्लॉक व सेंसर रिमूव्ह करतात. पण तोपर्यंत हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले असतात.

वेलेंटीन गानचेव्ह नावाच्या एका विकृत यूटय्ूबरने देखील असेच काही व्हिडीओ बनवले. त्यात एक व्यक्ती त्याला बेदम मारहाण करत असून नंतर खड्ड्यात जिवंत दफन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. असेच विकृत व्हिडीओ रशियातील यूट्यूबर बनवत असून पैसे कमवत आहेत.

- Advertisement -