घरताज्या घडामोडीLive Update: कोल्हापूर स्थानकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखल, हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन कार्यकर्त्यांची...

Live Update: कोल्हापूर स्थानकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखल, हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Subscribe

महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरकडे जाण्यास निघाले असताना त्यांना ठाणे, दादर, कल्याण स्थानकात आडवण्याची शक्यता होती, मात्र त्यांना कोणीही रोखले नसून ते कोल्हापूराच्या दिशेने रवाना झाले आहे.


किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरच्या दिशेला रवाना झाले आहेत. सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविरास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मुश्रीफ समर्थकांनी त्यांना कोल्हापुरात येण्याचं आव्हान दिलं आहे

- Advertisement -

रात्री ९ वाजेपर्यंत मुंबईतील गिरगांव, दादर चौपट्या, शीतल, पवई आदी तलाव या नैसर्गिक व विभागनिहाय कृत्रिम तलावांत मिळून, सार्वजनिक – १,९१० आणि घरगुती – १७,६२३ अशा एकूण १९,५३३ गणेशमूर्तींचे आणि २४६ गौरी अशा एकूण १९, ७७९ गणेशमूर्तीचे व गौरींचे विसर्जन करण्यात आले. या एकूण विसर्जनात कृत्रिम तलावात विसर्जित ७१० सार्वजनिक गणेश मूर्ती, ७,७६१ घरगुती गणेश मूर्तीं अशा एकूण ८,४७१ गणेशमूर्तींचा आणि ९५ गौरींचा समावेश आहे.


मुंबईत गेल्या २४ तासांत ४२० नव्या कोरोना रूग्णांची नोंद, ५२३ जणांनी केली कोरोनावर केली मात आणि ५ मृत्यूंची नोंद

- Advertisement -


राज्यात गेल्या २४ तासात ३ हजार ४१३ कोरोना रूग्णांचे निदान

कोल्हापूर स्थानकावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखल, हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन कार्यकर्त्यांची घोषणाबाजी


किरीट सोमय्या असलेले महालक्ष्मी एक्सप्रेस ठाण्यात दाखल, ठाणे स्थानकांत पोलिसांचा मोठा फौजफाटा


वर्षा निवासस्थानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये आज सायंकाळी श्री गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , त्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच परिवारातील सदस्य उपस्थित होते.


कायद्याचं राज्य आहे, कायद्यानुसार कारवाई करावी. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची सरकारची जबाबदारी असल्याचे प्रविण दरेकरांनी म्हटले आहे.


कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मुंबईत लागू करू शकत नाही- प्रविण दरेकर


सोमय्यांना दादर किंवा ठाण्यात पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता


किरीट सोमय्यांना विरोध करण्यासाठी मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सोमवारी कोल्हापूरच्या कागलमध्ये २५ हजार जनता एकवटणार


सोमय्यांसोबत आणखी एक सहकारी कोल्हापूरला रवाना


किरीट सोमय्या कोल्हापूरला ८.२० च्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरात रवाना


किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले आहेत. ते सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन सूटणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला जाणार आहेत. पण सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहोचताच मुंबई पोलिसांनी त्यांना अडवलं


किरिट सोमय्या कोल्हापूरला जाणार असून आधी गिरगाव चौपाटीवर बाप्पाचं दर्शन घेणार असल्याच्या मतावर ठाम. त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजेची सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन महालक्ष्मी एक्सप्रेस ही ट्रेन पकडणार


पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे विधीमंडळ गटनेते म्हणूनही निवड करण्यात आल्याचे हरीश रावत यांनी जाहीर केले आहे.


किरीट सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्याआधीच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. किरीट सोमय्या यांच्या घरी पोलीस दाखल झाले असून गृहमंत्र्यांनी आपल्याला अटक करण्याचा आदेश काढल्याचा सोमय्यांचा दावा. मुश्रीफांच्या साखर कारखान्यावर जाणार आहेत सोमय्या. तुम्ही येवूनच दाखवा मुश्रीफ सर्मथकांनी दिला इशारा


मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश, घराखाली मोठा पोलीस फौजफाटा तैनात केल्याचा किरीट सोमय्यांचा दावा. कोल्हापूर दौरा थांबवण्यासाठी ठाकरे सरकारची दडपशाही असल्याचेही सोमय्यांचे मत


पुण्याच्या मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जनानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचेही विसर्जन


काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधावा पंजाबचे नवे मुख्यमंत्री, काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रंधावा यांच्या नावावर केला शिक्कामोर्तब सविस्तर वाचा 


लालबागच्या राजाचं झालं विसर्जन


लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल. थोड्याच वेळात होणार राजाचं विसर्जन. 


माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घराच्या बाप्पा निरोप दिला आहे. सागर बंगालच्या निवासस्थान असलेल्या कुत्रिम तलावात फडणवीसांनी बाप्पाचं विसर्जन केलं.


लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. पाहा लाईव्ह


देशात गेल्या काही दिवसांपासून ३० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३० हजार ७७३ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३०९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३८ हजार ९४५ जण कोरोनामुक्त झाले आहे. देशातील आता कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ३४ लाख ४८ हजार १६३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ४४ हजार ८३८ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी २६ लाख ७१ हजार १६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ३ लाख ३२ हजार १५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला लोकांची मोठी गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी मिरवणुक अडवल्याचे समोर येत आहे.


थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या आरतीला सुरुवात झाली आहे. पाहा मायमहानगरवर लाईव्ह..


गणेशगल्लीचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. गिरगावच्या दिशेने गणेशगल्लीचा राजा मार्गस्थ होत आहे.


अनंत चतुर्दशी निमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेकडून मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुंबईत सर्व विसर्जनास्थळी योग्यती व्यवस्था पालिकेने केली असून गणेश विसर्जनासाठी पालिका सज्ज झाली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सर्वतोपरी काळजी घेऊन गणरायाला निरोप देण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक मूर्तीचं घरी विसर्जन शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करावे. विसर्जनासाठी जास्तीत जास्त ५ व्यक्तींना मुभा देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी १० पेक्षा अधिक लोकं नको, असे पालिकेने सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे विसर्जनाला जाणाऱ्यांचे लसीकरण झालेलं असणं आवश्यक आहे.


पुण्यात गणपती विसर्जनासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यानिमित्ताने पुण्यात सात हजार पोलीस तैनात केले आहेत. लोकांनी गर्दी टाळण्यासाठी मंडपातच मानाच्या गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड येथील आज सर्व दुकानं बंद राहणार आहेत.


मध्य रेल्वेवर आज माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप ते डाऊन मार्गावर ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक नसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -