घरताज्या घडामोडीLive Update: पुण्याला ६ हजार रेमडेसिवीरचा साठा मिळाला

Live Update: पुण्याला ६ हजार रेमडेसिवीरचा साठा मिळाला

Subscribe

पुण्याला आज ६ हजार रेमडेसिवीरचे इंजेक्शन देण्यात आले, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचार बंदी घालण्यात आली आहे. २४ तासांची प्रचार बंदी घालण्यात आली आहे. प्रचारादरम्यान हिंदू-मुस्लिम वक्तव्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहित निवडणूक आयोगाने दिली आहे.

- Advertisement -

आयपीएलचा चौथा सामना आज राजस्थान रॉयल आणि पंजाब किंग्स या दोन संघात रंगणार आहे. राज्यस्थान रॉयलने टॉस जिंकला आहे.


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयने समन्स बजावला असून बुधवारी देशमुखांची चौकशी होणार आहे.


मेडिकलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वेळेवरच होणार असल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली. पण याबाबत राज्यपाल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल. तसेच मेडिकलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षांबाबत ७२ तासांत निर्णय घेणार असल्याचे देशमुख म्हणाले.


आंबेडकर जयंती घरी साजरी करा, दीक्षाभूमी स्मारक समितीचे आवाहन

येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेडकरी जनतेने घरूनच साजरी करावी, असे आवाहन नागपूर दीक्षाभूमी स्मारक समितीने केले आहे. कोरोनाची परिस्थिती याही वेळी बदललेली नाही. उलट अधिक भयावह झालेली आहे. ते लक्षात घेता आंबेडकरी जनतेने याही वर्षी संयम दाखवित आंबेडकर जयंती घरूनच साजरी करावी, असे आवाहन स्मारक समितीतर्फे केले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.


एनआयए ने अटक केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी याला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस दलातून काझी यांना निलंबित करण्यात आल्याचे पत्रक जारी करण्यात आले आहे. रियाजुद्दीन काझी यांना एनआयए ने रविवारी मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणातील सहभाग आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. रियाजुद्दीन काझी हे सचिन वाझे याच्या मर्जीतील अधिकारी असल्याचेही सांगितले जात आहे.


कोरोना रूग्णांच्या उपचारासांठी खाटांची कमतरता भासत आहे. त्यामुळे आता रेल्वे कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून आली आहे. पश्चिम रेल्वेतर्फे ३८६ आयसोलेशन कोच तयार करण्यात आले असून ते रूग्णांकरता उपलब्ध आहेत. त्यापैकी १२८ कोच हे मुंबई विभागात आहेत. राज्य सरकारच्या मागणीनुसार हे कोच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगितले जात आहे.


माहिती आणि जनसंपर्क विभागात कोरोनानं तिसरा मृत्यू

माहिती आणि जनसंपर्क विभागातील संगीता बिसांद्रे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. संगीता बिसांद्रे मंत्रालयात उपसंपादक पदावर काम करत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे माहिती आणि जनसंपर्क विभागातील हा तिसरा मृत्यू आहे. याआधी पुणे येथील राजेंद्र सारंग आणि नाशिक येथील राजेंद्र येवले यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता.


मुंबईच्या वाकोला पोलिस स्टेशनमधील एका ५४ वर्षीय पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या मृत्यू झाला आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारांसाठी बीकेसी जंबो कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र कोरोनाशी त्यांची सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. दरम्यान, कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत १०१ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.


गेल्या २४ तासांत १ लाख ६८ हजार ९१२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने हा आकडा वाढून बाधितांचा एकूण आकडा १ कोटी ३५ लाख २७ हजारांवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत १ लाख ७० हजार १७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


 

सर्वोच्च न्यायालयात कोरोनाचा फैलाव; न्यायमूर्ती त्यांच्या निवासस्थानातून घेणार सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांच्यावर १० दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या खड्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शरद पवार यांना पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास असल्यामुळे त्यांना ३० मार्चला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज शरद पवार यांचे पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.


पालघर डहाणूचे भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे कोरोनाने निधन

भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गुजरातच्या वापी येथील रेनबो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, सोमवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पास्कल धनारे हे २०१४ साली डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. काही दिवसांपूर्वी पास्कल धनारे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर धनारे यांची प्रकृती खराब होत गेली. त्यामुळे पास्कल धनारे यांना वापी येथील रेनबो रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र, ही झुंज अपयशी ठरली.


बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगांव, जामोद परिसरात आज सकाळी अवकाळी पावसाने कहर केल्याचे समोर आले आहे. या जिल्ह्यात रविवारपासून ढगाळ वातावरण असल्याने आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा दिला आहे. या अवकाळी पावसाने वातावरणात काहीसा गारवा पसरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -