घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात २४ तासांत १,७३६ नव्या रुग्णांची वाढ, ३६ जणांच्या मृत्यूची...

Live Update: राज्यात २४ तासांत १,७३६ नव्या रुग्णांची वाढ, ३६ जणांच्या मृत्यूची नोंद

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ७३६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ३ हजार ३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाख ७९ हजार ६०८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३९ हजार ५९८ जणांचा मृत्यू झाला असून ६४ लाख ४ हजार ३२० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ३२ हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


महाराष्ट्र बंदला जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. बंदमध्ये मारहाणीच्या घटना घडल्या असतील तर काँग्रेस त्याचे समर्थन करत नाही. महाराष्ट्र बंदला भाजपने केलेल्या विरोधाचा निषेध करतो. राज्य सरकारचे आंदोलन नव्हते, पक्षांनी केलेल्या आंदोलनाला सरकारने दिलेला पाठिंबा होता – नाना पटोले

- Advertisement -

आजच्या बंदमुळे मविआचा ढोंगीपण उघड झाला.  दमदाटी करुन आजचा बंद केला. मविआ सरकारला बंदी करण्याची नैतिकता नाही. शेतकऱ्यांना एका पैशाचीही मदत केली नाही. आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे – देवेंद्र फडणवीस


 

- Advertisement -

महाराष्ट्र बंदवर विरोधकांचा आक्षेप, राज्य सरकारकडून पोलिसांचा गैरवापर


राजभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त, काँग्रेसचे मौन आंदोलन, नाना पटोले आंदोलनास्थळी दाखल, काळ्या फिती बांधून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी


आर्यन खानच्या जामीन अर्जावर बुधवारपर्यंत सुनावणी, आर्यन खानची न्यायालयीन कोठडी बुधवारपर्यंत वाढली


राज्यभरात महाराष्ट्र बंदसाठी शिवसैनिक आक्रमक


काँग्रेसचं राजभवनावर ‘मूक आंदोलन’


नागपूरच्या संविधान चौकात शिवसेनेचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक संतप्त झाल्याचे पहायला मिळत आहेत.


ष्णमुखानंद सभागृहात ५० टक्के उपस्थित दसरा मेळावा पार पडणार असून शिवसेनेचे वरिष्ठ नेते, उपनेते,मंत्री, मुंबईतील आमदार, महापौरांसह काही नगरसेवक दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहणार – संजय राऊत


देशातील शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. न्यायाची सुरुवात महाराष्ट्रापासून होणार – संजय राऊत


महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर मेकॅनिक चौकात आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याना फौजदार चावडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


 

देशात गेल्या २४ तासात १८,१३२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून १९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २१,५६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात सध्या २,२७,३४७ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


कोल्हापूरात मोर्चा काढणारे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात. महाराष्ट्र बंंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात शिवसेनेकडून मोर्चा काढत रास्ता रोको करण्यात आला त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.


पुण्यात दुपारी १२ वाजेपर्यंत १४०० बसेस बंद राहणार आहेत. पुण्यातील पीएमपीएल सेवा दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहणार असून पुणेकरांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत सर्वांना शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले आहे.


महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सुरुळीत सुरू ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदला लोकलवर कोणताही परिणाम पहायला मिळत नाही. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी  येथील हिंचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.


 

उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. याविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि मुंबई अध्यक्ष व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक व कार्यकर्ते सकाळी १०.३० वाजता हुतात्मा चौक, मुंबई येथे उपस्थित राहणार असून लखीमपूर येथील नरसंहाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये सहभागी होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -