Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड

Live update Maharashtra political crisis CM Eknath shinde Uddhav thackeray Thackeray group Advocate Kapil Sibbal Supreme Court NCP Sharad Pawar MPSC Student BJP Kirit Somayya Maharashtra Maharashtra politics China Earthquake

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड


८० टक्के भूमिपूत्रांना नोकऱ्या देण्याचा ठराव- उदय सामंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सर्वाधिकार देण्यात आलेत.

28 फेब्रुवारीपासून एसटी कर्मचारी आंदोलन करणार

आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आझाद मैदानात आंदोलन करणार


मुंबईतील शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल


चिंचवडमध्ये आदित्य ठाकरे आणि अजित पवारांचा रोड शो सुरू


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २३ फेब्रुवारी रोजी कसब्यात सभा


खासदास संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार – राजा ठाकूर


यूपीच्या पर्यटन विभागाच्या उपसंचालकाची आत्महत्या

मुंबईतील टिळक नगर परिसरात घडली घटना

१२ व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या


संजय राऊत यांचा खासदार श्रीकांत शिंदेवर गंभीर आरोप

खासदार श्रीकांत शिंदेने दिली मला मारण्याची सुपारी : संजय राऊत

संजय राऊतांच मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी देण्यात आली : राऊत


महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणीला सुरुवात

ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद करताना सुप्रीम कोर्टात उपस्थित करण्यात येत आहेत अनेक प्रश्न

विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबत कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद आज संपवावा : सरन्यायाधीश चंद्रचूड

१२ आमदारांचा प्रश्न प्रलंबित ठेवणे हे राज्यपालांचे राजकारण : कपिल सिब्बल

बहुमत असलं तरी आमदार आसाममध्ये बसून कसा निर्णय घेतात? : सिब्बल

मंत्रिमंडळाचा सल्ला न घेता राज्यपाल निर्णय घेऊ शकतात का? : कपिल सिब्बल

कपिल सिब्बल यांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद

तुम्हाला बहूमत चाचणी मान्य आहे का? सरन्यायाधीशांची विचारणा


उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमख : संजय राऊत

निवडणूक आयोगाचा निकाल घटनाबाह्य आणि एकतर्फी : राऊत

हा आनंद फार काळ टिकणार नाही, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

आम्ही शिंदे गटाला शिवसेना मानत नाही : संजय राऊत


एनआयएनंतर आयकर विभागाच्या पथकाची ११ राज्यात छापेमारी

११ राज्यांमध्ये ६४ ठिकाणी टाकले छापे

उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, तामिळनाडू, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये टाकण्यात आले छापे


सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाची निवडणूक आयोगाविरोधात याचिका मेंशन

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून याचिका मेंशन

ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या दुपारी ३.३० वाजता होणार सुनावणी


शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज होणार महत्त्वाची बैठक

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले अॅक्शन मोडमध्ये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आज संध्याकाळी 7 वाजता ताज प्रेसेंडेंट हॉटेलमध्ये होणार बैठक


एनआयएकडून सात राज्यात ७०पेक्षा अधिक ठिकाणी टाकण्यात आले छापे

राष्ट्रीय तपास संस्थेने पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यात टाकले छापे

गुंड आणि गुन्हेगारी सिंडिकेटशी संबंधित प्रकरणात हे छापे टाकण्यात आल्याची माहिती


बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून होणार सुरुवात

राज्यातून 14 लाख 57 हजार 293 देणार बारावीची परीक्षा

राज्यात 3 हजार 195 केंद्रावर होणार परीक्षा

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21 हजार 396 कर्मचारी कार्यरत

271 भरारी पथके राज्यभरातील परीक्षा केंद्रावर ठेवणार लक्ष


बारावी बोर्ड परीक्षेच्या तोंडावर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारले काम बंद आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठातील शिक्षेकतर कर्मचारी धरणे आंदोलन करणार

आंदोलनाचा परिणाम बारावीच्या परीक्षेवर होण्याची भीती


महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुरु होणार सुनावणी

सुप्रीम कोर्टात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर पार पडणार सुनावणी


आज दुपारी १२ वाजता मंत्रालयात होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्हं मिळाल्यानंतरची ही पहिली मंत्रीमंडळ बैठक


कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय काकडे यांची होणार सभा

चिंचवड पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांचा होणार रोड शो