Live Update: मुंबईत २४ तासांत ४८१ नव्या रुग्णांची वाढ, ३ जणांचा मृत्यू

corona update 18 october 2021 t20 world cup 2021 Kerala Rain yuvraj singh political happenings
corona update 18 october 2021 t20 world cup 2021 Kerala Rain yuvraj singh political happenings

मुंबईत गेल्या २४ तासांत ४८१ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आता मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४९ हजार ७४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार १६७ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख २५ हजार २८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ५ हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


राज्यात आज दिवसभरात २ हजार २१९ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ हजार १३९ रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाख ८३ हजार ८९६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३९ हजार ६७० रुग्णांचा मृत्यू झाला असून ६४ लाख ११ हजार ७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात २९ हजार ५५५ सक्रिय रुग्ण आहेत.


दिल्लीत गेल्या २४ तासांत ३१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एका रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दिल्लीत सध्या ३३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


वकील अली काशिफ मुनमुनच्या बाजूने म्हणाले की, ‘माझ्याविरोधातले केस पूर्णपणे बनावी आहे. मला बलदेव नावाच्या इसमाने पार्टीसाठी बोलावलं होतं म्हणून मी गेले होते. त्याला अटक करण्यात आली नाही आणि मला अटक करण्यात आली. जर एका रुममध्ये ड्रग्स सापडलं तर सगळ्यांची चौकशी व्हायला हवी होती, ती न होता मला अटक करण्यात आली. क्रूझवर १३०० लोकं होते. सोमिया नावाच्या मुलीकडे रोलिंग पेपर सापडला पण तिला जाऊ देण्यात आलं. मला पार्टीत ग्लॅमर यावा म्हणून बोलावण्यात आले होते माझ्याकडे काहीही सापडलं नाही.’


विक्रांत, इष्मीत आणि अरबाज यांच्याकडून ड्रग्स सापडलं पण आर्यनकडून नाही. आतापर्यंत जो तपास एनसीबीचा झालाय त्यात ना ड्रग्सची रिकव्हरी आर्यन खानकडे झालीय ना ड्रग्सच सेवन झाल्याचं कळलं. ड्रग्सच सेवन करणे, त्याची विक्री करणे हे आरोप आर्यनसाठी लागू होत नाहीत – अमित देसाई


आर्यन आणि अरबाज हे मित्र आहेत. ते मुनमुनला ओळखतही नाहीत मात्र या दोघांसोबत तिलाही अटक करण्यात आली आणि ३ तारखेला कोर्टात हजर करण्यात आलं. दोघांशी निगडित जो पंचनामा झाला त्यात मुनमुनचा संबंध नव्हता -अमित देसाई


अमित देसाई – एनसीबीच्या पंचनाम्यानुसार आर्यनकडे ना ड्रग्स सापडलं ना पैसे. जर त्याच्याकडे पैसेच नाहीत तर तो ड्रग्स विकत घेऊन सेवन कसे करू शकतो ना विकत घेऊ शकत. आर्यन आणि जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सचाही संबंध नाही. एनसीबीने दुसऱ्यांदा ज्यावेळी आर्यनचा रिमांड मागितला त्यावेळी आधीच्याच रिमांडमधल्या मुद्द्यांचा आधारे मागण्यात आला.


एनसीबी ड्रग्स प्रकरणात अनेकांना अटक करतेय ही चांगली गोष्ट आहे. पण ज्यांच्याकडे काहीही सापडलं त्यांना असं अडकवून ठेवणे चुकीचं आहे. यांचा दुसऱ्यांदा रिमांड मिळेपर्यंत दुसऱ्या आरोपीना अटक करून कोर्टात हजरही केलं नाही – अमित देसाई


७ तारखेला एनसीबीने आर्यनच्या व्हाट्सअॅप चॅटमध्ये धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा कोर्टात केला. शिवाय आर्यनकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आचित कुमारला अटक केल्याचे सांगितले मात्र आचितची अटक आणि क्रूझ पार्टीच कोणतेही कनेक्शन अद्याप समोर येऊ शकले नाही – अमित देसाई


आर्यन खान याचा जबाब ३ ऑक्टोबरला नोंदवण्यात आला त्यानंतर नाही. आचित कुमार याच्याकडे फक्त २.६ ग्रॅम चरस सापडलं. या सगळ्या बाबींचा विचार करून जामीन मिळणं गरजेचं आहे. एनसीबीची कस्टडीची मागणी ७ तारखेला किला कोर्टाने फेटाळून लावली आणि आर्यन खानसहित इतरांना न्यायालयीन कोठडी सुनावली.


आर्यन खानसाठी अमित देसाई यांचा युक्तिवाद सुरु आहे. गरज पडल्यास सतीश मानेशिंदेही युक्तिवाद करणार आहेत. अमित देसाई म्हणाले की, प्रतीक गाबा याच्या निमंत्रणावरून आर्यन खान त्यादिवशी क्रूझवर गेला होता मात्र तो क्रूझवर पोहोचण्याआधीच त्याला ताब्यात घेण्यात आलं.


अमित देसाई – विक्रांत चोकर आणि इष्मीत सिंग यांनाही क्रूझवर जाताना एनसीबी अधिकाऱ्यांनी अडवलं आणि विचारलं की त्यांच्याकडे ड्रग्स आहे का तर त्यांनी हो म्हणून स्वतःकडचे ड्रग्स काढून एनसीबी अधिकाऱ्यांना दाखवलं अस एनसीबीचा पंचनामा म्हणतोय.  पण वास्तव हे आहे की आर्यन खान यांच्याकडे काहीही सापडलं नाही. पण एनसीबीच्या पंचनाम्यात असं म्हणण्यात आलंय की अरबाजकडे सापडलेले चरस आर्यन खान क्रूझ पार्टीत वापरणार होता हे त्याने मान्य केलं.


समाजातील प्रभावशाली व्यक्ती म्हणून या अर्जदाराकडून पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते. तसेच या प्रकरणातील ओळखीच्या साक्षीदारांवरही प्रभाव टाकला जाण्याची शक्यता आहे, असे एनसीबी कोर्टात म्हणाले.


प्रथमदर्शनी चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले आहे की, आर्यन खानचा पेडलर्ससोबत अतिशय जवळचा संपर्क आणि नेक्सस आहे. या गुन्ह्यातील सहआरोपींना याआधीच अटक करण्यात आली असून हे एनसीबीच्या कस्टडीत आहेत. तसेच हे आरोपी एकमेकांशी कनेक्टेड असून यांची एकमेकांसमोर चौकशीही करण्यात आली आहे.


क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात झाली आहे. एनसीबी सध्या कोर्टात बाजू मांडत आहे.


सीमाप्रश्नी राजकारण न करता सर्वपक्षीयांनी भूमिका घेणे गरजेचे आहे. सीमेवरील सद्याची परिस्थिती चिंताजनक आहे. केंद्राकडून यंत्रणांचा सतत गैरवापर केला जातोय. केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय वापर होत आहे. सीबीआय, ईडी, एनसीबीचा गैरवापर होत आहे. अनिल देशमुखांवर आरोप करणारे पोलीस अधिकारी आहेत कुठे? देशमुखांवर पाच वेळा छापे टाकून यंत्रणांना काय मिळाले? केंद्राकडून यंत्रणांचा सतत गैरवापर केला जातोय.
– शरद पवार


राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. लखीमपूर हिंसाचाराप्रकरणी राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान २ न्यायमूर्तींकडून चौकशी व्हायला हवी असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले.


महाविकास आघाडीतील नाराजी ताटात आणखी काही तरी पाडून घेण्यासाठी असते. फडणवीस सरकारमध्ये राज्यातील महिला सुरक्षित होत्या. आता महिलांवरील अत्याचारावर सुप्रिया सुळे, निलम गोर्हे,विद्या चव्हाण गप्प का आहेत? उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडत नसल्याने जनतेच्या त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत – चंद्रकांत पाटील


देशात गेल्या २४ तासात १५,८२३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे २२,८४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात सध्या २,०७,६५३ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तसेच देशात गेल्या २४ तासात ५०,६३,८४५ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.


आज १०० लाख कोटींच्या पंतप्रधान गतिशक्ती योजनेचा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या महत्त्वकांक्षी योजनेचा शुभारंभ होणार आहे. लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी आणि पायाभूत सुविधांचा मास्टरप्लॅन तयार करण्यात आला आहे.


कुर्ला परिसरात ३०-३५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. जळत्या सिगारेटचे थोटुक फेकल्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे लोट इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहचले होते.