Live Update: राज्यात गेल्या २४ तासांत २,३८४ नव्या रुग्णांची वाढ, ३५ जणांचा मृत्यू

corona update 18 october 2021 t20 world cup 2021 Kerala Rain yuvraj singh political happenings
corona update 18 october 2021 t20 world cup 2021 Kerala Rain yuvraj singh political happenings

राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार ३८४ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ हजार ३४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील आता कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाख ८६ हजार २८०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३९ हजार ७०५ मृत्यू झाला असून ६४ लाख १३ हजार ४१८ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात २९ हजार ५६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथे पोहेचले आहेत. त्यांच्या हस्ते पार्क येथील सौंदर्यीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर उपस्थिती होत्या.


मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी वानखेडे यांनी आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवत असल्याची तक्रार केली होती. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी वानखेडे यांना मुंबई पोलीस समन्स पाठवणार आहेत.


आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्या जामीन अर्जांवर न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी निर्णय राखून ठेवला. २० ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले.


अजूनही आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुरू आहे. आर्यन खानच्या जामीनाला एनसीबी विरोध करत आहे.


म्हाडा कोकण मंडळाकडून ८,९८४ घरांची लॉटरीची सोडत ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात येत आहे. ठाणे आणि पालघरमधील कोकण म्हाडाच्या घरांची सोडत सुरू झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत घरांची सोडत होणार आहे.


आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात किरण गोसावीला पुणे पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून किरण गोसावी यांना देशाबाहेर जाता येणार नाही. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार आहे.


आज म्हाडाच्या ८ हजार ९८४ घरांसाठी सोडत निघणार असून सकाळी १० वाजचा ठाणे, कल्याण,विरार,मिरारोड घरांसाठी सोडत निघणार आहे. संगणक पद्धतीने ही सोडत जाहीर होणार आहे.


आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. कालही आर्यनच्या जामिनावर सुनावणी करण्यात होती मात्र त्यावर कालची रात्रही आर्यनला कोठडीत काढावी लागली. त्यामुळे आर्यनला जामिन मिळाणार का? कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.


माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची काल तब्येत खालावली होती. ताप आल्याने त्यांना काल संध्याकाळी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून ते आज आणि उद्या रुग्णालयात उपचारांसाठी थांबणार आहेत.