Live Update: उद्या मुंबईतील लसीकरण केंद्रावर फक्त महिलांना लस दिली जाणार

india corona update monsoon update maharashtra coronavirus section 144 omicron 12 december 2021 PM Modi Twitter accout hack sharad pawar birthday
india corona update monsoon update maharashtra coronavirus section 144 omicron 12 december 2021 PM Modi Twitter accout hack sharad pawar birthday

कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उद्या शनिवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-१९ लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.

मुंबईतील सर्व २२७ निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालये तसेच कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येवून (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. ह्यात कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा देखील घेता येणार आहे. फक्त महिलांसाठी राखीव विशेष सत्राच्या कारणाने उद्यासाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.


पुण्याच्या कोरोना परिस्थितीवर आज आढावा बैठक पार पडली. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री पत्रकार परिषद घेऊन कोण-कोणत्या निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. याबाबत सांगत आहेत.

  • पुण्यात सोमवारपासून पर्यटन स्थळे सुरु करण्यात येणार
  • ग्रामीण आणि शहरी भागातील पर्यटन स्थळे सुरु करण्यात येणार
  • २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह आणि नाट्यगृह ५० टक्क्यांच्या प्रमाणे सुरु करण्यात येणार
  • ट्रेनिंग सेंटर सुरु करण्यात येणार
  • पण प्रवेशासाठी दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक
  • महाविद्यालयात दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना परवानगी

मेघवाडी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई केली आहे. ४० हजार रुपये घेताना एसीबीने कार्यालयात सापळा रचून अटक सुजाता पाटील यांना अटक केली आहे. त्यांनी
तक्रारदाराकडे १ लाखाची मागणी केली होती.


पुण्यात राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले आहे. भाजपविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. अजित पवारांच्या कंपन्यांवर आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या छापेमारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.


मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह २०२१चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान केला करण्यात आला आहे.


आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आले आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर आज कोर्टात सुनावणी सुरू आहे. आर्यनसह सर्व आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आले आहे.


ड्रग्ज प्रकरणा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. आर्यनच्या जामीन अर्जावर आज कोर्टात सुनावणी होणार असून त्या सुनावणीला सुरुवात झाली आहे.


नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिक्षकाला अटक करण्यात आली आहे.  नवी मुंबईत राहणाऱ्या नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या २५ वर्षीय अधिक्षकाने प्रवासी महिलेची प्रवासा दरम्यान छेड काढून तिच्या अंतर्वस्त्रासोबत विकृत चाळे केल्याप्रकरणी अधिक्षक दिनेश चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. दिनेश चव्हाण हे मागील काही महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.  त्यांच्यावर मानसिक आजारावर उपचार सुरू असल्याचे देखील एनसीबीने म्हटले आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

 


ज्यांच्या हाती देशाची सत्ता त्यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग करत आहेत हे सगळे पाहत आहेत. शांततेत निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप नेत्यांनी गाड्या घातल्या. शेतकऱ्याची हत्या करणाऱ्या भाजप सरकारविरोधात ११ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देणार आहे या बंदला पाठिंबा देत बंदमध्ये शांततेत सहभागी व्हा – शरद पवार


पार्थ पवार यांच्या नरिमन पॉईंट कार्यालयात आयकर विभागाने छापेमारी करण्यात सुरुवात केली आहे. महत्त्वाची कागदपत्रे आयकर विभागाने ताब्यात घेतली आहेत.


भारतीय हवाई दलाचा आज ८९ वा वर्धापन दिन आहे. गाझियाबादच्या हिंडन वायुतळावर हवाई दलाचे सामर्थ्य पहायला मिळत आहे. विमानांच्या चित्तथराक कसरतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.


अरुणाचल सेक्टरमध्ये चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या २०० चिनी सैनिकांना पळवून लावले आहे. अरुणाचलमध्ये गेल्या आठवड्यात झटापट झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यातही दोन्ही देशांच्या सैन्यात झटापट झाली होती.


आयकर खात्याचा वापर करुन अजित पवारांना बदनाम केले जाते आहे. पवारांच्या नातेवाईकांवर केलेली कारवाई ही सूडबुद्धीचे केली आहे. तीनही पक्ष कारवाईला घाबरत नाहीत. भाजपच्या नेत्यांनी किती बँका बुडवल्या हे उद्या पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवून उघड करणार – नवाब मलिक


लखीमपूर हिंसाचाराप्रकरणी २ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून आशीष मिश्रा यांची आज चोकशी होणार आहे.


अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यावर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाने छापेमारी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूमध्ये सचिन शृंगारे यांच्या आयान मल्ट्रीट्रेंड कारखान्यावर दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली आहे.