घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत २४ तासांत आढळले १,४६३ नवे रुग्ण, ४९ जणांचा मृत्यू!

Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले १,४६३ नवे रुग्ण, ४९ जणांचा मृत्यू!

Subscribe

मुंबई गेल्या २४ तासांत १ हजार ४६३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ४७ हजार ३३४वर पोहोचला असून आतापर्यंत ९ हजार ९१८ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच आज दिवसभरात मुंबईतील १ हजार २८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख १६ हजार ५५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या मुंबईत १९ हजार ४९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

राज्यात ७,५३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६,२५,१९७ झाली आहे. राज्यात १,५०,०११ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४२,८३१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

तामिळनाडूमध्ये आज ३ हजार ७७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तामिळनाडूतील कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाख १९३ पार झाला आहे. यापैकी आतापर्यंत १० हजार ८२५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६ लाख ५५ हजार १७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३४ हजार १९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


एकनाथ खडसे मुंबईत दाखल झाले आहे. समर्थकांकडून खडसे यांचं राष्ट्रवादीचे झेंड दाखवून स्वागत करण्यात आलं. उद्या एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे.


घाटकोपर: सुंदर बाग येथील गारमेंट फॅक्टरीला आग लागल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २ गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


मुंबईत खासगी सुरक्षा रक्षकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यास मुभा दिली आहे. गणवेशधारी सुरक्षा रक्षकांना लोकलमध्ये प्रवेश मिळणार आहे. अधिकृत ओळखपत्रावर ट्रेनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. राज्य सरकारचे रेल्वेला यासंदर्भात पत्र दिले आहे.


पालघर मॉब लिंचिंग प्रकरण: ठाणे विशेष सत्र न्यायाधीशांनी ७० आरोपींच्या जामीनाची सुनावणी ३ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केल्या आहे.


बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांना पटनाच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दुर्गापूजनावर पंतप्रधान मोदी बंगालच्या लोकांशी संवाद साधणार


अमित राज ठाकरेंना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ताप येत असल्यामुळे खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अमीत ठाकरे यांच्या तातडीने काही चाचण्यात केल्या गेल्या होत्या. त्यामध्ये कोरोना चाचणीचाही समावेश होता. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


देशात गेल्या २४ तासांत ५५ हजार ८३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांचा आकडा ७७ लाख ०६ हजार ९४६ इतकी झाली आहे. त्यातील ७ लाख १५ हजार ८१२ अॅक्टिव्ह केसेस असून काल त्यात २४ हजार २७८ नव्या रुग्णांची नोंद त्यात झाली आहे. तर आतापर्यंत १ लाख १६ हजार ६१६ जणांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


पालघरमधील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी सीआयडीकडून आणखी २४ जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणी एकूण १७८ जणांना अटक केली आहे.


ब्राझीलमध्ये ऑक्सफोर्ड लस चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात जवळपास १२ लस अशा आहेत ज्यांची चाचणी अंतिम टप्प्यात आहेत. या चाचण्यांमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि AstraZeneca ची कोरोना लस सर्वात चांगली असल्याचे म्हटले जाते. मात्र यासंदर्भात, एक वाईट बातमी अशी आहे की या लसीच्या चाचणी दरम्यान ब्राझीलमध्ये एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतेय.(सविस्तर वाचा)


ओमी कलानीच्या एका नेत्यावर प्राणघातक हल्ला

ओमी कालानीचे नेते संदीप गायकवाड यांच्यावर श्रीराम टॉकिज येथे काही लोकांनी तीन राऊंड फायर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुदैवाने एकही गोली त्यांना लागली नाही. मात्र नंतर लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर व पायावर हल्ला केला. त्यात ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या ते आयसीयूमध्ये असल्याचे समजते.


राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार १४२ नवे कोरोनाबाधित आढळले असून १८० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख १७ हजार ६५८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४२ हजार ६३३ जणांचा मृत्यू झाला असून १४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.५१ टक्के एवढे झाले आहे. तर मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -