घरताज्या घडामोडीLive Update: एकनाथ खडसेंनंतर भाजपचा आणखी एक नेता राष्ट्रवादीत जाणार

Live Update: एकनाथ खडसेंनंतर भाजपचा आणखी एक नेता राष्ट्रवादीत जाणार

Subscribe

ड्रग्ज पेडलर्सच्या ठिकाणावर छापेमारी करताना एनसीबी पथकावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे जखमी झाले आहेत.


एकनाथ खडसेंनंतर भाजपचा आणखी एक नेता राष्ट्रवादीत जाणार आहे. भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

- Advertisement -

‘मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. तर अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम राज्य सरकारने केले. राज्य सरकारने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे’, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादच्या परिषदेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.


मुंबई – कांदिवलीतील भाजप आंदोलनात पुन्हा पोलीस-आंदोलक आमनेसामने आले आहेत. अतुल भातखळकरसह आंदोलक भाजप नेते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

वाढीव वीज बिलाविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. मुंबईत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात भाजपचे आंदोलन सुरू आहे. कांदिवली तहसीलदार कार्यालयाबाहेर वीज बिलाची होळी केली. राज्यातील अनेक ठिकाणी भाजप आंदोलन करत आहे.


पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले संग्राम पाटील यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले.


देशात गेल्या २४ तासांत ४४ हजार ५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९१ लाख ३९ हजार ८६६वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३३ हजार ७३८ जणांचा मृत्यू झाला असून ८५ लाख ६२ हजार ६४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


देशात २२ नोव्हेंबरपर्यंत १३ कोटी २५ लाख ८२ हजार ७३० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात ८ लाख ४९ हजार ५९६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले संग्राम पाटील यांचं पार्थिळ मूळगावी दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे येथील संग्राम पाटील यांना राजौरीत वीरमरण आलं. आज संग्राम पाटील यांनी अखेरचा निरोप दिला जात आहे. सध्या निगवे गावावर शोककळा पसरली आहे.


जगातील अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे लोकांची चिंतेत आणखीन वाढ होताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारी, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ कोटी ८९ लाख ८० हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १३ लाख ९३ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ४ कोटी ७ लाख ६३ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


काल (रविवार) राज्यात ५,७५३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,८०,२०८ झाली आहे. राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -