Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: राज्य सरकारकडून रेमडेसिवीर इंजेक्शनचे दर निश्चित 

Live Update: राज्य सरकारकडून रेमडेसिवीर इंजेक्शनचे दर निश्चित 

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारकडून रेमडेसिवीर इंजेक्शनचे दर निश्चित करण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन २३६९ रुपयांना मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आलं आहे.


राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.५२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ३४७ नवे रुग्ण आढळले असून १८४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ३२ हजार ५४४वर पोहोचला आहे.


- Advertisement -

गेल्या २४ तासांत ६९ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. आतापर्यंत २६ हजार ०५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. १ हजार ७३० सक्रिय प्रकरणे आहेत. तर २४ हजार ०५३ बरे झाले आहेत. २७४ जणांचा मृत्यू झाला आहे.


- Advertisement -

भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं.


अष्टपैलू क्रिकेटर आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवी दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचाराकरिता दाखल केले आहे. तसेच कपिलदेव यांच्यावर अँजिओप्लास्टी होणार असल्याची माहिती मिळत आहे.


कोल्हापुरात एसटी-कार अपघातात चौघांचा मृत्यू

कोल्हापूरमध्ये कळंबे बावडा रोडवर मारुती कार आणि एस. टी बसममध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अंत्यविधीला जातानाच काळाने डाव साधला आणि या अपघातांमध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

विक्रमनगर कोल्हापूर येथील माळवे कुटुंबीय हे कळे (तालुका गगनबावडा) येथील नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी चालले होते. दरम्यान सकाळी साडेनऊ वाजता कणकवली आगराची एसटी गाडी व मारुती कार (MH 09 BW 41 41) यांची समोरासमोर धडक झाली. यामधील जखमी व्यक्तींना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मध्ये दाखल करण्यात आले आहे.


खडसेंच्या पक्षप्रवेश सोहळ्याला ११ दिग्गज हजर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे प्रवेश करत असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


पश्चिम रेल्वेची एसी लोकल सेवा आज बंद

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात असणाऱ्या वातानुकूलित रेल्वेच्या डब्याला गुरुवारी रात्री कारशेडमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रात्री पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. ही वातानुकूलित ट्रेन मुंबई सेंट्रल येथील कारशेडमध्ये उभी होती. या ट्रेनला रात्री अचानक आग लागली. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या प्रकारामुळे आज दिवसभर पश्चिम रेल्वेची एसी रेल्वे सेवा बंद राहणार आहे. (सविस्तर वाचा)


आजपासून पूर्ण क्षमतेने BEST बस धावणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरता बेस्ट प्रशासनासह रेल्वे प्रशासनाकडून सेवा देण्यात येत होती. मात्र आजपासून पूर्ण क्षमतेने बस चालवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रम, जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी दिली आहे.


शिक्षण मंत्री उदय सामंत यांची दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद


देशात गेल्या २४ तासांत ५४ हजार ३६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांचा आकडा ७७ लाख ६१ हजार ३१२ इतका झाला आहे. तर देशात सध्या ६ लाख ९५ हजार ५०९ अॅक्टिव्ह केसेस असून त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे. दरम्यान गुरूवारी या कोरोना रूग्ण संख्येत २० हजार ३०३ रुग्णांची घट झाली आहे. तर आतापर्यंत १ लाख १७ हजार ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे बैठकांना उपलब्ध

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले असले तरी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. उपमुख्यमंत्री आवश्यकतेनुसार व्हीसी व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. शासकीय नस्त्यांवर निर्णय घेणे, अधिकाऱ्यांना सूचना देणे, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेणे, फाईलींचा निपटारा करणे आदी कार्यालयीन कामे निवासस्थानावरुन नियमित व सुरळीत सुरु आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री हे ‘देवगिरी’ निवासस्थानाहून व्हीसीद्वारे सर्व बैठकांसाठी उपलब्ध असून त्यांच्या गृहविलगीकरण काळातही राज्य शासनाची निर्णयप्रक्रिया सुरु राहील, याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. असेही उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.


बिहारमध्ये मोदी आज घेणार निवडणूक प्रचाराच्या तीन सभा

बिहार विधानसभेच्या राजकीय रणांगणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी उतरत आहेत. पंतप्रधान मोदी आज निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच दिवशी सासाराम, गया आणि भागलपूर येथे तीन सभांना संबोधित करतील. या सभांमध्ये पंतप्रधानांसोबत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार देखील असतील. मात्र, बिहार निवडणुकीचा प्रचार करत असताना पंतप्रधान मोदी एनडीएपासून वेगळे झालेल्या लोक जनशक्ती पक्षाबाबत काय बोलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग लागली असून गेल्या दहा तासांहून अधिक वेळेपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. (सविस्तर वाचा)


आज मोठी राजकीय घडामोड

गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपमधून फुटून बाहेर पडलेले माजी विरोधी पक्षनेते, माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे आज दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात ७,५३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६,२५,१९७ झाली आहे. राज्यात १,५०,०११ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४२,८३१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -