Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले ८०१ नवे रुग्ण, २३ जणांचा मृ्त्यू!

Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले ८०१ नवे रुग्ण, २३ जणांचा मृ्त्यू!

Related Story

- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासांत ८०१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ५२ हजार ८८८वर पोहोचला आहे. तसेच यापैकी आतापर्यंत १० हजार १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ३६३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ११५ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ५४ हजार २८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार ४६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


आज रात्री १० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांशी संवाद साधणार आहेत.


- Advertisement -

देशातील आता रिकव्हरी रेट ९०.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. रिकव्हरी रेट सातत्याने वाढत असल्यामुळे देशात चांगली चिन्ह दिसत आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.


मराठा आरक्षणाबाबत सरकार पळ का काढतंय?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

मराठा आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षणासाठी हे सरकार गंभीर नाही असा आरोप चंद्रकांत सपाटील यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही, असा संतप्त सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. (सविस्तर वाचा)


राज्यात कांदा निर्यात प्रश्न चिघळला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या विषयी दिल्लीत बोलणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच उद्या, बुधवारी शरद पवार कांदा उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांची भेट घेतील, असेही भुजबळ यांनी सांगितले.

मराठा आरक्षण स्थगिती प्रकरणाची सुनावणी ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

Corona : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण

सोमवारी अभिनेत्री पायल घोषनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि नेते देखील उपस्थित होते. आज सकाळी रामदास आठवले यांची केलेली चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रामदास आठवलेंना सौम्य लक्षणं असल्याची माहिती मिळत आहे. (सविस्तर वाचा)

मराठा आरक्षणाची सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली. मराठा आरक्षणाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार होती. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच ही सुनावणी पार पडणार होती. राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर असणारी नाराजी तसेच आरोप-प्रत्यारोप होत असताना होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागले होते.


राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याला कोरोना संसर्ग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. तटकरे यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. (सविस्तर वाचा)


देशात ३६,४६९ नव्या कोरोना रूग्णांचे निदान

देशात कोरोनाचा कहर कमी होताना दिसतोय. भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण ७९ लाखांहून अधिक लोकांना झालेली असली तरी १ लाख १९ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह या आजाराने सावरणाऱ्यांची संख्याही सतत वाढत आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ३६ हजार ४६९ नवीन रुग्ण आढळले आहेत तर यावेळी ४८८ लोक या जीवघेण्या विषाणूचे बळी ठरले आहेत. (सविस्तर वाचा)


पाकिस्तानातील पेशावरमध्ये IED चा स्फोट; ७ जणांचा मृत्यू तर ७० जखमी

पाकिस्तानातील पेशावरमध्ये IED चा बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर येत आहे. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पेशावरमधील दीर कॉलनीमध्ये ही घटना घडली असून लेडी रीडिंग रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी दिलेल्या माहितीनुसार ७० जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्याात आली असल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील तब्बल १०६ एसटी कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात चालक आणि वाहकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सांगली विभागातून बेस्ट उपक्रमासाठी काही कामगार हे मुंबईला गेले होते. त्यानंतरच या सर्वांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती मिळतेय. सांगलीमधील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने एसटी प्रशासनाची धाकधूक अधिकच वाढली आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात आतापर्यंत १४,७०,६६० रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात आज नव्या रुग्णसंख्येत सर्वाधिक घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ६४५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख ४८ हजार ६६५वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. सोमवारी दिवसभरात राज्यातील ९ हजार ९०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १४ लाख ७० हजार ६६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२ टक्के एवढे झाले आहे.


मराठा आरक्षण प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

मराठा आरक्षण प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज १२ वाजता होणार सुनावणी होणार असून मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतरची ही पहिली सुनावणी असणार आहे. त्यामुळे या सुनावणीत काय होतंय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आरक्षणाला स्थगिती देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्यात आले होते. पण आज होणारी सुनावणी ज्या खंडपीठाने स्थगिती दिली, त्याच नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे होणार आहे.

- Advertisement -