घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत २४ तासांत आढळले १,१२० नवे रुग्ण, ३३ जणांचा मृत्यू!

Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले १,१२० नवे रुग्ण, ३३ जणांचा मृत्यू!

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार १२० नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ५५ हजार ३६२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १० हजार १८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात मुंबईत १ हजार ८२४ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आतापर्यंत एकूण २ कोटी २६ हजार ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या १८ हजार ३६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काल ५५.६९ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती निवडणुक आयोगाने दिली आहे.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासांत १० लाख ७५ हजार ७६० कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत १० कोटी ६५ लाख ६३ हजार ४४० कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी भारत सरकारने माहिती दिली आहे.


महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ५ हजार ९०२ नवे रुग्ण आढळले असून १५६ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहेत. तसेच आज दिवसभरात ७ हजार ८८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ६६ हजार ६६८ रुग्णांवर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ४३ हजार ७१० रुग्णांचा मृत्यू झाला असून १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या १ लाख २७ हजार ६०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


कांदा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात वर्षावर बैठक होणार आहे. कांदा उत्पादक शेतकरी, कृषीमंत्री या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.


अकरावीचे प्रवेश लवकर सुरू होणार आहेत. प्रवेश करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.


दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी एसटीची हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे. (सविस्तर वाचा)


प्रदूषणाविरोधातील लढ्यात दिल्ली सरकार ग्रीन दिल्ली ऍप लाँच केले आहे. दिवाळी काही दिवसांवर आली असताना, सरकारने कडक पावले उचलली आहेत. ग्रीन क्रॅकर्सशिवाय, इतर कोणतेही फटाके उडवल्यास १ लाख रुपये दंड आकारला जाणार आहे. सरकार यासाठी ११ टीमची स्थापना करत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून ही टीम काम सुरू करणार आहे. दिल्लीची हवा खराब न होऊ देण्याबाबत सुप्रीम कोर्टानेही आदेश दिले आहेत.


राज्यात गेल्या २४ तासात ९५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून महाराष्ट्र पोलीस दलातील बाधितांचा आकडा २६ हजार ३९५ वर पोहोचला आहे. त्यापैकी १ हजार ५१७ पोलिसांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत तर २४ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे.


गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी पुण्यातील रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व चाचण्या करण्यात आल्या. या सर्व चाचण्यांचे अहवाल नॉर्मल असल्याने थोड्याच वेळात त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनानंतर विश्रांती न घेतल्याने हा त्रास जाणवला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना सक्तीने विश्रांती घेण्यास सांगितले आहे.


गुरूवारी पहाटे ०४:४५ वाजताच्या सुमारास कोपर गाव, चारू भामा म्हात्रे शाळा जवळ, डोंबिवली येथे मैना ‘व्ही २’ (तळ+दोन मजली / एकूण १८ रूम) या धोकादायक इमारतीचा भाग कोसळला. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी डोंबिवली अ. केंद्राचे १ वाहन व कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित असून उर्वरित इमारत तोडण्याचे काम सुरु आहे.


देशात कोरोना रुग्ण निदर्शनास येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या देखील केल्या जात आहे. देशात बुधवारी 10 लाख 75 हजार 760 जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली तर आता पर्यंत एकूण 10 कोटी 65 लाखांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या झाल्याची माहिती ICMR कडून देण्यात आली आहे


देशात एका दिवसात 49,881 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे तर या काळात 517 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 80,40,203 झाली आहे. यापैकी 6,03,687 अॅक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार

राज ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी १०.१५ मिनिटांनी राज ठाकरे राज्यपालांना भेटणार आहेत.


येत्या ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८.१९ वाजता ‘ब्लू मून’ पाहण्याचा दुर्मिळ योग येणार आहे. महिन्यातून एकदा होणारे पूर्ण चंद्राचे दर्शन ऑक्टोबर महिन्यात दोनदा होणार आहे. एकाच महिन्यात दोनदा पूर्ण चंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या पूर्ण चंद्राला इंग्रजीत ‘ब्लू मून’ असे म्हटले जाते. एखाद्या दुर्मीळ प्रसंगाला इंग्रजीत ‘वन्स इन अ ब्लू मून’ असे म्हटले जाते. १७ व्या शतकात याचा पहिलांदा वापर करण्यात आला होता. दरवर्षी प्रत्येक महिन्याला एक असे वर्षाला १२ पुर्ण चंद्र दिसतात.


डिसेंबरमध्ये कोरोनाव्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. मला आशा आहे की, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही परंतु जर तसे झाले तर आम्ही तयार आहोत, असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.


कोरोनाचे संकट अजूनही देशासह जगभरात कायम आहे. अशात कोरोनावरील लस कधी येणार याचीच सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतात सध्या कोरोनाच्या काही लसींची चाचणी केली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीबाबत दिलासादायक वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात जेव्हा कधी कोविड लस उपलब्ध होईल, तेव्हा प्रत्येक नागरिकाला त्याची लस दिली जाईल. कोणीही त्यापासून वंचित राहणार नाही. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -