घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत आज दिवसभरात १,१४५ नव्या रुग्णांची वाढ, ३२ जणांचा मृत्यू

Live Update: मुंबईत आज दिवसभरात १,१४५ नव्या रुग्णांची वाढ, ३२ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार १४५ नवे रुग्ण आढळले असून ३२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ५६ हजार ५०७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १० हजार २१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात १ हजार १०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख २७ हजार १४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या १८ हजार ४३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार १९० नवे रुग्ण आढळले असून १२७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ७२ हजार ८५८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार ८३७ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 

- Advertisement -

केडीएमसी, नवी मुंबई, वसई विरार या तीन महापालिकासह अंबरनाथ बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुका ६ महिने पुढे ढकलल्या आहेत. या महापालिकांची मुदत ऑक्टोबरमध्ये संपत होती. कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता एप्रिल, मे मध्ये निवडणुका होऊ शकतील.


पुण्यात १५ वर्षाच्या मुलीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार झाल्याप्रकरणी चार आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -


मराठा समाज्याच्या पश्नाला गांभीर्याने घेत नसल्यामुळे आता तुळजापूरनंतर पंढरपूर येथून मंत्रालयापर्यंत आक्रोश पायी मोर्चा काढत आहोत. या मोर्चामध्ये सर्व महाराष्ट्रातील मराठी समाज, ४२ बांधव शहीद झालेल्याचे कुटुंब, गुन्हा दाखल झालेले सर्व युवक असे सर्व मराठा बांधव असणार आहेत.


खाडी, समुद्र प्रदूषित केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेला ३० कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई शहरातील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करणे, सांडपाण्यातून घनकचरा, प्लास्टिक समुद्रात, खाडीत मिसळणे, यामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे.


नाशिकमधील कांदा खाऊक बाजारात ४ दिवसानंतर व्यापार पुन्हा सुरू झाला. केंद्र सरकारने लादलेल्या स्टॉक मर्यादेविरोधात व्यापारी आंदोलन करत होते.


भिवंडीत Monginis केक कारखान्याची इमारत कोसळली

भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील श्रीराम कम्पाऊंडमधील मॉन्जिनीस केक कारखान्याची दोन मजली इमारत कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने कामगारांना सुट्टी झाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. (सविस्तर वाचा)


देशात गेल्या २४ तासांत ४८ हजार ६४८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांची संख्या ८० लाख ८८ हजार ८५१ इतकी झाली आहे. तर एका दिवसांतील मृतांची संख्या ५६३ असून आतापर्यंत १ लाख २१ हजार ०९० जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात एकूण ५ लाख ९४ हजार ३८६ सक्रिय रुग्ण असून गेल्या २४ तासांत ९ हजार ३०१ जणांची वाढ त्यात झाली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या गुजरात दौर्‍यावर आहेत. सध्या ते अहमदाबाद येथे दाखल झाले आहेत.


कोरोना संकट आणि लॉकडाउनमुळे मुंबईतल्या १४ वर्षांच्या मुलावर चहा विकण्याची वेळ आली आहे. हा मुलगा चहा तयार करुन मुंबईतील भेंडी बाजार नागपाडा या ठिकाणी चहा विकतो. “माझं चहाचं दुकान नाही मी चहा तयार करुन भेंडी बाजार, नागपाडा आणि इतर भागांमध्ये विकतो. दिवसाकाठी ३०० ते ४०० रुपये मिळतात. ते पैसे मी आईला देतो. काही पैशांची बचत करतो” असं या मुलाने ANI ला सांगितलं आहे. कोरोना संकट आणि लॉकडाउन यामुळे या मुलावर चहा विकण्याची वेळ आली आहे.


कांद्याच्या साठवणुकीच्या प्रश्नावर केंद्र सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर अखेर कांद्याचे लिलाव सुरू करण्यास व्यापाऱ्यांनी तयारी दर्शवली. कांदा व्यापाऱ्यांना केंद्र सरकारने थोडासा दिलासा दिला असून स्टॉकलिमिट मर्यादा बदलास नकार दिला आहे. दरम्यान खासदार भारती पवारांच्या पाठपुराव्याला यश आले असून कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता शुक्रवारपासून कांद्याचे लिलाव सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ऐन सणा सुदीच्या काळात लिलाव बंद झाल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली होती. मुंबईत आज कांदा व्यापारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली होती. तर दिल्लीतही व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू होती. साठवणुकीची मर्यादा कायम ठेवली. त्यात बदल करणार नसल्याचे सांगितले. मात्र खरेदी विक्रीसाठी ३ दिवसांची मुदत मिळणार आहे. त्यामुळे देशांतर्गत, कांदा ट्रान्सपोर्टेशन करीता मोठा दिलासा मिळाला आहे.


आज कोजागिरी पौर्णिमा

वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा म्हणतात. या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागरी पौर्णिमा असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. सन २०२० मध्ये शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी निज अश्विन पौर्णिमा आहे. शरद पौर्णिमेला अनेक अद्भूत महायोग जुळून येत आहेत. जाणून घ्या, मुहूर्त… (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -