घरताज्या घडामोडीLive Update: इयत्ता दहावी, बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबर नंतरच सुरू - शिक्षणमंत्री

Live Update: इयत्ता दहावी, बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबर नंतरच सुरू – शिक्षणमंत्री

Subscribe

महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला दाखल झाले आहेत. विधानसभेच्या १२ जागांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहेत. यावेळी अमित देशमुख, अनिल परब, नवाब मलिक देखील उपस्थित आहेत.


देशातील विद्यापीठांसह महाविद्यालयं शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू करण्यासाठी युजीसीने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, राज्यात विद्यापीठं आणि महाविद्यालये सुरु होण्यासाठी विद्यार्थ्यांना वाट पाहवी लागणार आहे. कारण, युजीसीच्या गाईडलाइन्सनंतर राज्यातील कॉलेज सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दिवाळीनंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री, कुलगुरूंच्या बैठकीनंतर निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया उच्च शिक्षणंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

- Advertisement -

दिवाळीपूर्वी मुंबईच्या बाजारपेठेत ग्राहकांची फटाके घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी

- Advertisement -

विद्यार्थी व शिक्षकांच्या भावनांचा आदर करून व त्यांच्या दिवाळीच्या सुट्टीच्या मागणीचा विचार करून शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच ७ नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२० पर्यत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ५ नोव्हेंबर मधील परीपत्रकानुसार १२ नोव्हेंबर २० ते १६ नोव्हेंबर २०२० अशी सुट्टी देण्यात आली होती. यात आता बदल करून १४ दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या या निर्णयाचे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.


शालान्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे दहावी व बारावीच्या परीक्षा वेळापत्रकासंदर्भात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षा मंडळातर्फे परीक्षा जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन शाळा अध्ययन-अध्यापन प्रक्रिया व परीक्षा पार पाडण्यासाठी सरकार सक्षमपणे विचार करेल असे शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.


 

देशात ५ नोव्हेंबरपर्यंत ११ कोटी ५४ लाख २९ हजार ९५ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात १२ लाख २० हजार ७११ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


देशात गेल्या २४ तासांत ४७ हजार ६३८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६७० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८४ लाख ११ हजार ७२४वर पोहोचला असून १ लाख २४ हजार ९८५ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच गेल्या २४ तासांत देशातील ५४ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ७७ लाख ६५ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २० हजार ७७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


जगातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ कोटी ९० लाख पार झाला आहे. यापैकी आतापर्यंत १२ लाख ३९ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३ कोटी ४९ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


गुरुवारी दिवसभरात राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,०३,४४४ झाली आहे. राज्यात १,०६,५१९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ११७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ४४, ८०४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -