Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: कोरोना काळातील पहिलं सॅटलाईट इस्रो आज केले लाँच 

Live Update: कोरोना काळातील पहिलं सॅटलाईट इस्रो आज केले लाँच 

Related Story

- Advertisement -

कोरोना काळातील पहिलं सॅटलाईट इस्रो आज केले लाँच

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यावर्षीचं पहिलं सॅटलाईट आज लाँच करणार आहे. इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून १० सॅटलाईट लाँच केली जाणार आहेत. आज दुपारी ३ वाजून २ मिनिटांनी ही सॅटलाईट अवकाशात झेपावले. इस्रोनं वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार पोलर सॅटलाईट लाँच वेहिकलची (PSLV-C49) ही ५१ वी मोहीम असणार आहे. याद्वारे इस्रो EOS-01 प्रायमरी सॅटलाईट म्हणून आणि ९ इंटरनॅशनल कस्टमर सॅटेलाईट लाँच करणार आहे.

- Advertisement -


राजस्थाननंतर राज्य सरकारही फटाके बंदीच्या विचारात!

- Advertisement -

राजस्थानमधील फटाके बंदीनंतर आता राज्य सरकारही फटाके बंदीचा विचार करत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. मात्र आरोग्य मंत्र्यांच्याच जिल्ह्यात फटाके बंदीला विरोध होताना पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूला येऊन आठ महिने झाले. त्यानंतर आता अनलॉकही झालं. त्यामुळे सर्व फटाके विक्रेत्यांनी लाखो रुपयांचे फटाके खरेदी करुन ठेवले असून ऐनवेळेला सरकारने फटाक्यांवर बंदी घातली तर या व्यवसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं, असं जालना फटाके असोसिएशनने म्हटलं आहे. तर सरकारला बंदी घालायचीच असेल तर मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या एमआयडीसीतल्या कंपन्यांवर बंदी घाला, एका दिवसाच्या सणावर बंदी घालून राज्य सरकारला काय मिळणार आहे? असा सवाल उपस्थित करत यात फक्त राजकारण होत असल्याचं फटाके असोसिएशनने म्हटलं आहे.


दिल्लीत गेल्या २४ तासात दिल्लीत ७ हजार १७४ नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आजवर संपूर्ण देशात २४ तासात वाढलेली हा सर्वात मोठा आकडा असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच केरळमध्ये ७ हजार दोन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दिल्लीने त्याच्या पुढेही मजल मारल्याने काल या वाढीने नवा विक्रमच नोंदवला आहे.(सविस्तर वाचा)


बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान १ वाजेपर्यंत ३४,८२ टक्के झाल्याची नोंद करण्यात आली.


पंढरपुरात मराठा ठोक मोर्चाच्या वतीने आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नाही. पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य राखीव दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. या दोन्ही मोर्चांकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


देशभरात ६ नोव्हेंबरपर्यंत ११ कोटी ६५ लाख ४२ हजार ३०४ नमून्यांची तपासणी करण्यात आली आहे. असल्याची माहिती ICMR ने दिली आहे.


देशात २४ तासांत ५०,३५७ नव्या कोरोना रूग्णांचे निदान

देशात गेल्या २४ तासांत ५० हजारांहून अधिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ५७७ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ८४ लाख ६२ हजार ८१ वर पोहोचला आहे. देशात सध्या ५ लाख १६ हजार ६३२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात ५३ हजार ९२० जणांनी कोरोनावर मात केली आहे. यासह ७८ लाख १९ हजारांहून अधिकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात १६ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांमध्ये आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील मतदार आज एकूण १ हजार २०८ उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ट्विट करत मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करत एक नवा रेकॉर्ड करण्याचं आवाहन केलं आहे. करोना संकटात बिहार विधानसभा निवडणूक पार पडत असून पहिलीच निवडणूक ठरली आहे.


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरू आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा नागपुरातील हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्या, अशी मागणी नागपूर जिल्ह्यातील भाजप आमदारांनी केली आहे. त्यामुळे आता या आमदारांच्या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. (सविस्तर वाचा)


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी निघणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्रीक्षेत्र नामदेव पायरीवरुन सकाळी अकराच्या सुमारास निघणाऱ्या आक्रोश मोर्चात सामील होण्याचं आवाहन आयोजकांनी केले आहे.


‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत तब्बल ५१ हजार कोरोनाग्रस्तांचा शोध घेण्यात यश आले आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा ही मोहीम राबविण्याचा निर्णय सरकारने शुक्रवारी घेतला. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर अशा दोन टप्यांत राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक राज्यातील दोन कोटी ७६ लाख ३३ हजार ९८२ घरांपैकी दोन कोटी ७४ लाख ६३ हजार (९९ टक्के) घरांपर्यंत म्हणजेच ११.९२ कोटी लोकसंख्येपर्यंत पोहोचले. या मोहिमेमुळे ५१ हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या कमी होत असून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत तब्बल ६३ टक्के घट झाली आहे.


राज्यातील कोरोनाचा Recovery Rate ९१.३५ टक्क्यांवर

गेल्या २४ तासात ११,०६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १५,६२,३४२ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.३५ % एवढे झाले आहे.तर दिवसभरात राज्यात ५,०२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १६१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.

- Advertisement -