घरताज्या घडामोडीLive Update: पिंपरी पोलीस स्टेशनच्या आवारातील वाहनांना भीषण आग

Live Update: पिंपरी पोलीस स्टेशनच्या आवारातील वाहनांना भीषण आग

Subscribe

पिंपरी पोलीस स्टेशनच्या आवारातील वाहनांना भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत दहा ते बारा वाहनं जळून खाक झाली असून दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. पोलिसांनी जप्त केलेली ही वाहनं असून अनेक महिन्यांपासून ती इथंच पडून आहेत. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


ड्रग्जप्रकरणी NCB कडून अर्जुन रामपाल यांना समन्स देण्यात आला असून ११ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.

- Advertisement -

अर्णब गोस्वामींचा जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला

अर्णब गोस्वामींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार असून नियमाप्रमाणे सत्र न्यायालयात जामिनासाठी याचिका करावी, असे हायकोर्टाचे निर्देश असून अर्णब गोस्वामींचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे. अर्णब यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. तो फेटाळताना सत्र न्यायालयाला चार दिवसात निर्णय देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. चार दिवसात सुनावणी नाही झाली तर अर्णब यांची दिवाळी तळोजा कारागृहातच जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे वेतन मिळणार – परिवहन मंत्री

एसटी कर्मचाऱ्यांना लगेच एका महिन्याचे वेतन देणार असून सणासाठी अग्रिम रक्कम तात्काळ देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.


रविवारी चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरी आणि कार्यालयात एनसीबीने छापा घातल्यानंतर आज सकाळी ७ वाजता अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी छापा घालण्यात आला असून अद्याप एनसीबीच्या ताब्यात आहे. (सविस्तर वाचा)


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि रिपब्लिक मिडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांचेशी बोलण्याची अनुमती द्यावी, अशीही सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली.

राज्यपालांनी यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती.


अभिनेता चिरंजीवी याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आला आहे.


दिल्लीसह एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ९ नोव्हेंबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.


दिवाळीच्या तोंडावर शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्समध्ये ५०० हून अधिक अंकांची वाढ झाली आहे. तर निफ्टीही आजपर्यंतच्या सर्वांत उंच स्तरावर आहे. निफ्टी २०० अंकांनी वाढत आहे.


देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार ९०३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८५ लाख ५३ हजार ६५७वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २६ हजार ६११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशातील ४८ हजार ४०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ७९ लाख १७ हजार ३७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ५ लाख ९ हजार ६७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


जगभरात कोरोना कहर कायम आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ५ कोटी ७ लाख ३१ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १२ लाख ६१ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ३ कोटी ५७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -