Live Update: राज्यात २४ तासांत आढळले ७,४२९ नवे कोरोनाबाधित, २१३ जणांचा मृत्यू!

live update

राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ४२९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २१३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ९ हजार ५१६वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४२ हजार ४५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सणासुदीच्या दिवशी हलर्जीपणा करू नका – पंतप्रधान


वेळोवेळी हात धुणे, मास्क लावणे गरजेचे आहे – नरेंद्र मोदी


प्रत्येक पातळीवर काळजी घेणे आवश्यक आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी


जोपर्यंत औषध येत नाही तोपर्यंत निष्काळजीपणा नको – नरेंद्र मोदी


कोरोनाची लस जोपर्यंत येत नाही तोवर लढा सुरू ठेवावा लागणार आहे. भारतात सध्या अनेक लसींवर काम सुरू आहे – नरेंद्र मोदी


कोरोनात घट होतेय, पण बेजाबदारपणा बेजबाबदार लोक कुटुंबाला धोक्या टाकतात


निष्काळजीपणा झाला तिथे कोरोना रुग्ण वाढेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी


देशवासियांना प्राण वाचवण्यात आपण यशस्वी झालो असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.


लॉकडाऊन संपला आहे पण कोरोना आहे – PM Modi


आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.


देशातील कोरोना रिकव्हरी रेट चांगला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


कोरोना काळानंतर आता आर्थिक गाडा वेग घेतोय, असं मोदी म्हणाले.


जनता कर्फ्यू पासून आतापर्यंत भारतीय लोकांना खूप लांब प्रवास केला आहे. असं देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले.


पुलवामा चकमकीत अजून एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना ठार केल्याचे समोर येत आहे.


राज्य सरकारच्या विनंतीनंतर रेल्वे कडून परवानगी देण्यात आली आहे. उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सविस्तर वाचा 


जम्मू-काश्मीर: पुलवामा येथे आज पोलीस आणि सुरक्षा दलातील चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असल्याचे समोर आले आहे.


बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची लगबग सुरू असून सातत्याने सभा होताना दिसत आहे. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही बिहार निवडणुकीसाठी प्रचार सभा घेणार आहेत. बिहारमधील पहिल्या टप्प्यात मतदानासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहा दिवसांत १८ प्रचाराचा मोर्चा काढणार आहेत. बिहार निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री योगी सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री योगी यांच्या निवडणूकीची प्रचार सभा आजपासून सुरू होणार आहेत. आज सीएम योगी यांची निवडणूक सभा कैमूरपासून सुरू होणार असून आज, २० ऑक्टोबर रोजी बिहारमधील कैमूर येथील सीएम योगी यांची पहिली जाहीर सभा सकाळी ११ वाजेपासून रामगड विधानसभेत होती. (सविस्तर वाचा)


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी ६ वाजता जनतेला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले की, “मी आज संध्याकाळी ६ वाजता देशाला संदेश देणार आहे. तुम्ही नक्की देखील सहभागी व्हा” दरम्यान ते कोणत्या मुद्दय़ावर नागरिकांशी संवाद साधणार आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी कोणतीच माहिती दिली नाही, पण पंतप्रधान मोदी देशातील सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाव्हायरस साथीच्या परिस्थितीची दखल घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या ७६ लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. (सविस्तर वाचा)


देशात आतापर्यंत १ लाख १५ हजाराहून अधिक कोरोनाचे बळी

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाख ९७ हजार ०६४ इतका झाला असून एका दिवसांत ४६ हजार ७९१ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ५८७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. सध्या देशामध्ये ७ लाख ४८ हजार ५३८ सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत ६७ लाख ३३ हजार ३२९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १ लाख १५ हजार १९७ जणांचा बळी या आजारामुळे गेला आहे. (सविस्तर वाचा)


दिवसभरात कोरोनाच्या 9,61,16,771 चाचण्यांची तपासणी


राज्य सरकारने तात्काळ पंचनामे संपवले पाहिजेत, पंचनामे होणार नाही तिथे मोबाइलने फोटो पाठवल्यास मदत दिली जाईल अशी भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दीर्घकालीन मदतीसाठी वेळ लागेल, पण तात्काळ मदत केली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (सविस्तर वाचा)


नुकसानग्रस्त भागांत पाहणी दौऱ्यांचा तिसरा दिवस

अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात त्याचा परिणाम अधिक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशात राजकीय नेत्यांनी नुकसानग्रस्त भागांत पाहणी दौरा सुरू केला असून आज, मंगळवारी या दौऱ्यांचा तिसरा दिवस आहे. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यात पाहणी दौऱ्याला सुरूवात केली.


राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ९८४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख १ हजार ३६५वर पोहोचली आहे. यापैकी ४२ हजार २४० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. आज राज्यातील १५ हजार ६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण १३ लाख ८४ हजार ८७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४८ टक्के एवढे झाले आहे. (सविस्तर वाचा)