Live Update: कॉमेडियन कुणाल कामराने संजय राऊत यांची मुलाखत घेतली

live update

कॉमेडियन कुणाल कामराने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतल्याचे समोर आले आहे. दोघांनी ट्विटरच्या माध्यमातून मुलाखत होणार असल्याचे सांगितले होते. खारमधील खासगी स्टुडिओत या मुलाखतीचे चित्रीकरण पार पडले आहे. पुढील दोन आठवड्याच्या आत या मुलाखतीचे प्रेक्षपण होणार आहे.


देशात शनिवारी दिवसभरात १० लाख ७८ हजार ५४४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत १० ऑक्टोबरपर्यंत ८ कोटी ६८ लाख ७७ हजार २४२ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १.३० वाजता राज्यातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत.


ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे आधारस्तंभ असलेले धडाडीचे कार्यकर्ते, निस्पृह वृत्ती, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा स्वभाव, नेहमी हसत खेळत सर्वांशी मिळून मिसळून वागणारे राजेंद्र वैती यांचं रात्री दुःखद निधन झालं आहे. ही सगळ्यांच्यासाठी अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दोन वेळेस काम पाहिले. राज्य ग्रंथालय संघावर देखील त्यांनी काम पाहिले असून राज्यभरातील ग्रंथालय कार्यकर्त्यांशी त्यांचा निकटचा संबंध होता. “ग्रंथमित्र” हा राज्य शासनाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाचे कार्याध्यक्ष, कार्यवाह, कार्यकारणी सभासद अशा विविध पदांवर काम पाहिलेले आहे तसेच अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. शिवसेनेचे माननीय आनंद दिघे साहेब यांच्याशी त्यांचा असलेला स्नेह खूप घनिष्ठ आणि निष्ठावान असा होता.


देशात गेल्या २४ तासांत ७४ हजार ३८३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९१८ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ७० लाख ५३ हजार ८०७वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ८ हजार ३३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६० लाख ७७ हजार ९७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ८ लाख ६७ हजार ४९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


जगात कोरोना विषाणूचा कहर कायम असून कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत ३ कोटी ७४ लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून यापैकी १० लाख ७७ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ कोटी ८१ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


शनिवारी राज्यात ११,४१६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,१७,४३४ झाली आहे. राज्यात २,२१,१५६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३०८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ४० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा