Live Update: चिंताजनक! राज्यात आज एका दिवसात ५१५ कोरोना रुग्णांचे मृत्यू

News Live Update

देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २० हजार ४८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ५१५ रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०,९७,४२३ वर पोहोचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १९,४२३ रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,७५,२७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,९१,७९७ इतके अॅक्टिव्ह रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्या विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.


पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील भारत आणि चीनी सैन्य यांच्या सुरू असलेल्या संघर्षाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत माहिती दिली. भारताची लडाखमधील ३८ हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन अधिकृतपणे चीनने हिसकावली असल्याचे आज समोर आले आहे. याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत भारत-चीन सीमेवरील तणावासंदर्भात माहिती देताना सांगितले. (सविस्तर वाचा)


संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लोकसभेत भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले ते पाहा..


माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांना काल रात्री उशीरा पुन्हा एकदा अटक करण्यात आली होती आणि कोर्टा पुढे हजर करण्यास सांगितले होते. पण आता पुन्हा मुंबईच्या बोरिवली कोर्टाने सर्व सहा जणांचा प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जामीन मंजूर केला आहे. तसेच जेव्हा समन्स बजावले जाईल तेव्हा त्यांना पोलिसांसमोर हजर व्हावे लागेल, असे कोर्टाने सांगितले आहे, अशी माहिती आरोपींचे वकील कमलेश यादव यांनी दिली आहे.


मुंबईतील माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. आज या सगळ्यांना कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे. उद्धव ठाकरेंबाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याच्या कारणावरुन माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी मुंबईत मारहाण करण्यात आली होती.


कंगना रनौतने पालिकेविरोधात २ कोटींचा नुकसान भरपाईचा दावा केला आहे.


मुंबई आणि ठाण्यात लवकरच परवडणारी घरं उभारणार असल्याची मोठी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. मायनगरी मुंबईत आपले स्वतःचे हक्काचे घर प्रत्येकाला असावं असं वाटतं. आता हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.


देशातील कोरोनाबाधित संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासांत देशात ८३ हजार ८०९ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून १ हजार ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४९ लाख ३० हजार २३७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८० हजार ७७६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३८ लाख ५९ हजार ४०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ९ लाख ९० हजार ६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रायलयाने दिली आहे.


माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे समोर येत आहे. दुपारी १२ वाजता राज्यपालांना मदन शर्मा भेटणार आहेत. काही दिवसांपूर्वी मदन शर्मा यांना मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती आहे. हे प्रकरण सध्या राज्यात चांगलेच चर्चेत आहे.


राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. जगातील कोरोनाबाधितांची यादीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राने कोरोनाबाधितांच्या आकड्यात रशियाला देखील मागे टाकले आहे. सोमवारी महाराष्ट्रात १७ हजार ०६६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ७७ हजार ३७४ वर पोहोचला आहे. तसेच सोमवारी १५ हजार ७८९ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आातपर्यंत एकूण ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ टक्के एवढे झाले आहे. तर सध्याचा मृत्यूदर २.७७ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा