घरताज्या घडामोडीLive Update : गृहमंत्री अनिल देशमुख सह्याद्रीवर दाखल

Live Update : गृहमंत्री अनिल देशमुख सह्याद्रीवर दाखल

Subscribe

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख शासकीय अतिथी गृह असलेल्या सह्याद्रीवर दाखल झाले आहेत. सह्याद्रीवर नेत्यांच्या बैठका होण्याच्या शक्यता आहे.


सचिन वाझे प्रकरणामुळे आणि गृहमंत्री खंडणी प्रकरणामुळे सरकारची प्रतीमा मलीन झाली आहे. राज्यात ठाकरे सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबई,पुणे, नागपूरमध्ये चिंताजनक वातावरण आहे. गर्दी जमवण्यास पूर्ण बंदी आणली आहे. ३ ट्री पद्धतीचे काटेकोर पालन करण्यात येत आहे.सामाजिक, राजकिय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राज्यात सर्वाधिक प्रमाणात कोरोना लसीकरण सुरु आहे.

- Advertisement -

सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कोरोना नियमांचे आणि निर्बंधाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगवर भर देण्यात आला आहे. सर्वाधिक कोरोना चाचण्या राज्यात केल्या जात आहेत. हाफकिनमध्ये लस निर्मितीला परवानगी, लस तयार करण्यास लवकरच सुरुवात होईल.

काही शहरांत लॉकडाऊन करावा लागेल. रुग्णसंख्या वाढली तर लॉकडाऊन करावा लागणार, २ दिवसांत राज्यतील लॉकडाऊनचा निर्णय होणार


माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर पत्राद्वारे आरोप केला आहे. परंतु आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज वाटत नाही असे वक्तव्य काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.


परमबीर सिंग केंद्र सरकारचा बोलका पोपट आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत केला आहे. विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केला आहे.


मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतरची हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती.


सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची माहिती चुकीची आहे. अनिल देशमुख ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत रुग्णालयात होते, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावरुन परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असं स्पष्ट होतंय. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं शरद पवार म्हणाले.


गेल्या २४ तासांत देशात ४६ हजार ९५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २१२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १६ लाख ४६ हजार ८१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५९ हजार ९६७ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ११ लाख ५१ हजार ४६८ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ३ लाख ३४ हजार ६४६ जणांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत ४ कोटी ५० लाख ६५ हजार ९९८ जणांचे लसीकरण झाले आहे.


गर्दी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांवर पंढरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

पंढरपूर पोटनिवडणुकीचा राष्ट्रवादी उमेदवार ठरवण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या श्रीयश पॅलेस येथे झालेल्या कार्यक्रमाला कोरोनाचे नियम डावलून शेकडोंनी गर्दी जमा झाली होती. अखेर कोरोना नियमांचे पालन न झाल्याने या कार्यक्रमाचे आयोजकांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


राज्यातल्या परीस्थितीची काँग्रेस हायकमांडकडून दखल घेण्यात आली असून सध्याच्या परीस्थितीचा काँग्रेस हायकमांडनं अहवाल मागवला आहे. प्रभारी एच के पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. बैठकीत नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर चर्चा केली.


राज्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. काल विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यातील अन्य काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. आज देखील राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -