Live Update : महाविकास आघाडी नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार – नाना पटोले

News Live Update

महाविकास आघाडी नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार – नाना पटोले

उद्या मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. भाजपच्या आरोपांवर प्रत्युत्तर देण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.


मनसुख प्रकरणातील दोन्ही आरोपी ATS कडून NIA च्या ताब्यात


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व नेते वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता. अजित पवार,जयंत पाटील,अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, दादाजी भुसे ,नवाब मलिक बैठकीला उपस्थित.


सर्व महसुली विभागांत अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा समप्रमाणात भरणार. सरळसेवा व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम 2021 ही नवीन अधिसूचना काढणार- सामान्य प्रशासन

गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या व डेड रेंट दरात सुधारणा करण्याचा निर्णय- महसूल

सारथी संस्थेस शिवाजीनगर पुणे येथे शासकीय जागा – महसूल

पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थेस पुणे जिल्ह्यातील चिखली येथे विस्तार केंद्रासाठी जागा- उच्च व तंत्रशिक्षण

रत्नागिरी येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय. शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास मंजुरी- उच्च व तंत्रशिक्षण विभाग

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास सुधारित मान्यता


मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. नुकतंच त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहेत. आमिर खान सध्या होम क्वारंटाईन झाला आहे.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासमादेशक परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. परमबीर सिंह यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एसके कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयात का गेला नाही? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने परबीर सिंग यांना केला आहे.


नागपुरात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरा समोर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. नागपुरातील आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरण वरून आंदोलन करण्यात आलं आहे. २०१६ मधील हे प्रकरण आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वेद प्रकाश आर्य यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.


नांदेड जिल्ह्यात आज मध्यरात्री पासून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना लक्षात घेऊन ही कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने २५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या दरम्यान शाळा, महाविद्यालये,कोचिंग क्लासेस, लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, मेळावे, आठवडी बाजार,सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल्स, बार, सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, चित्रपटगृह, मॉल्स, जलतरण तलाव ,राजकीय सभा, मटण चिकन ची दुकाने, पार्लर, सलून,सार्वजनिक  ठिकाणी फिरणे हे सर्वतः बंद राहणार आहे.


मुंबईतील बांद्रा भागात NCB च्या पथकाने छापा टाकून ड्र्गज तस्करी करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अटक केली. मात्र, छापा टाकायला गेलेल्या NCB च्या पथकाव ड्रग्ज पेडलरने कुत्रे सोडले. यावेळी छापा टाकायला NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे देखील होते. त्यांच्यावर देखील कुत्रे सोडण्यात आले.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. परमबीर यांच्या वतीनं मुकुल रोहतगी आणि राज्य सरकारकडून कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत.


हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.  अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे व पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.


सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनामुळे पुढील दोन आठवड्यांसाठी आठवडी बाजार बंद राहणार

सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन आठवड्यांसाठी आठवडी बाजार बंद राहणार आहे. मागील काही दिवसात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने निर्णय घेण्यात आला आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे राबवण्याच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.