घरताज्या घडामोडीLive Update: नागपुरात २४ तासांत आढळले ३,६८८ नवे रुग्ण, ५४ जणांचा मृत्यू!

Live Update: नागपुरात २४ तासांत आढळले ३,६८८ नवे रुग्ण, ५४ जणांचा मृत्यू!

Subscribe

नागपूर जिल्हायत आज दिवसभरात ३ हजार ६८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ हजार २२७ रिकव्हर झाले आहेत. तर ५४ रुग्णांची मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपूरमधील आता कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या २ लाख १४ हजार ८५०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ हजार ८७३ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ लाख ७२ हजार ६३४ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. सध्या ३७ हजार ३४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार आज रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सविस्तर वाचा 


तृणमूलला जिंकून देण्यासाठी ममतांनी मागितली मदत – भाजप नेता

- Advertisement -

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या पहिल्या टप्प्यात ३० जागांसाठी मतदान होत आहे. यादरम्यानच नंदीग्राममधील भारतीय जनता पक्ष (BJP) नेते प्रलय पाल यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. प्रलाय पाल म्हणाले की, ‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मला फोन केला होता आणि नंदीग्राममधून तृणमूल काँग्रेसला जिंकून देण्यासाठी मदत करण्यास सांगितले होते. जिथे त्यांच्या विरोधात भाजपचे सुवेंदू अधिकारी मैदानात उतरले आहेत.’


शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे, नाना पटोलेंना पडला प्रश्न

सध्या राज्यात वाझे, परमबीर सिंह यांचे प्रकरणावरून विरोधकांनी महाविकास आघाडीला कोंडीत पकडले आहे. परंतु आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्य़ांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. शरद पवार शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे आहेत हे तपासण्याची गरज आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

Pune Fire : फॅशन स्ट्रीट आगीच्या भक्ष्यस्थानी ४०० दुकानांची राखरांगोळी

आगीच्या घटनांनचे सत्र सुरु असतानाच पुण्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे शहरातील लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यालगतच्या प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट येथे शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच कँटोन्मेंट अग्निशमन केंद्र आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान, दोन ते अडीच तासांने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. या आगीमध्ये तब्बल ४०० दुकाने जळून खाक झाली असून सध्या कूलिंगचे काम सुरु असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.


गिरे तो भी टांग उपर अशी फडणवीसांची भूमिका- सचिन सावंत

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकंदरीत भाजपाकडून करण्यात येणाऱ्या आरोपावर आता काँग्रेसकडून प्रतिउत्तर देण्यात येत आहे. भाजपाने रश्मी शुक्ला आणि फोन टॅपिंग प्रकरणाचा सबंध पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांशी जोडत घोटाळा झाल्याचा आरोप केला. यावरून आज काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.‌ तसेच फडणवीसांनी सांगितलेले फोन टॅपिंगप्रकरणाचे पेन ड्राईव्ह कुठे आहे असा सवाल उपस्थित केला आहे.


क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर कोरोना पॉझिटिव्ह

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून मी सद्या माझ्या घरात होम क्वारंटाईन आहे. तर माझ्या संपर्कात असणाऱ्या घरातील मंडळीने कोरोनाची चाचणी केली असता त्यांची कोरोना टेस्ट निगेट्विव आली आहे’, अशी माहिती क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी दिली आहे.


भांडुप (प.) येथील ड्रिम मॉलमध्ये गुरुवारी रात्री उशिराने भीषण आग लागल्याची घटना घडली. याच मॉलमध्ये असलेल्या तिसर्‍या मजल्यावरील सनराईज रुग्णालयाला या आगीची मोठी झळ बसली. आगीच्या धुरामुळे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार घेणार्‍या ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी आता मुंबई महापालिकेने येत्या १५ दिवसात चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. भांडुपच्या ड्रिम मॉलला ओसी नसल्याचे देखील समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भंडाऱ्याची घटना झाल्यानंतर सर्व रुग्णालयांची फायर ऑडिट करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते. जी तात्पुरती रुग्णालये आहेत ,त्यांचं ऑडिट करणं आवश्यक होतं, मात्र तरी देखील ऑडिट करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत. तसेच सदर घटनेप्रकरणी आरोपींवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातलं मतदान

पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी निवडणूक होत असून निवडणुकीत पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडल आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३० मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, केंद्रीय सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -