Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: सांगोल्यातील तरूंगात ५४ पैकी २४ कैदी कोरोना पॉझिटिव्ह

Live Update: सांगोल्यातील तरूंगात ५४ पैकी २४ कैदी कोरोना पॉझिटिव्ह

Related Story

- Advertisement -

मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. नाथराव नेरळकर (वय ८७) यांचे आज औरंगाबादमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठवाड्यातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ नाथराव नेरळकरांनी मराठवाड्यात संगीत साधना केली होती. नाथरावांचं जन्मगाव नांदेड असून त्यांच्या पश्चात अनंत व जयंत नेरळकर ही दोन मुले, हेमा नेरळकर उपासनी ही मुलगी, सून, नातवंडे, असा परिवार आहे.


नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी मध्यरात्री एका फार्म हाउसवर छापा टाकला. गंगापूर धरणाजवळील एका फार्म हाऊसवर संगीताच्या तालावर हुक्का पार्टी सुरु होती. मद्यधूंद अवस्थेतील साधारण ३० जण पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहेत. या हुक्का पार्टीत महिलांचाही सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. तर ग्रामीण पोलिसांच्या धडक कारवाईने हॉटेल आणि फार्म हाऊस चालकांमध्ये चांगलीच दहशत बसली आहे.


- Advertisement -

सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या सांगोला तालुक्यातील सबजेल मधील २४ कैद्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला सबजेलमध्ये ५४ कैदी आहेत. त्यातील काही जणांना त्रास जाणवू लागल्याने तपासणी करण्यात आली होती. तपसणी करण्यात आलेल्या कैद्यांपैकी २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या कैद्यांवर सध्या उपचार सुरू आहेत.


औरंगाबाद शहरात कोरोनाचा कहर सुरू असून शहरात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असे असले तरी चिंता वाढवणारी बाब म्हणजे शहरात एकाच दिवसात तब्बल २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १ हजार ७१५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.


- Advertisement -

देशात कोरोनाचा कहर कायम. देशात गेल्या २४ तासांत ६२,७१४ नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील बाधितांचा एकूण आकडा हा १ कोटी १९ लाख ७१ हजारांवर गेला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १ कोटी १३ लाख २३ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. ही बैठक बारामतीतील
विद्या प्रतिष्ठानमध्ये सकाळी १द वाजता असणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते देशात होळीपूर्वी वेगाने वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. ‘मन की बात’चा ७५ वा भाग असणार आहे.

- Advertisement -