घरताज्या घडामोडीLive Updates: सचिन वाझेंचा NIA पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला, ७ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

Live Updates: सचिन वाझेंचा NIA पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला, ७ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

Subscribe

पुण्यात आंदोलन करताना भाजप खासदार गिरीश बापट यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपी बस, हॉटेल बंदला विरोध असून संचारबंदी रात्री ८ पासून करण्याची भाजपचा मागणी आहे. या कारणाने गिरीश बापट यांच्या नेतृत्वात पुण्यात हे आंदोलन सुरू होतं.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. शरद पवार यांची आज ब्रिट कँडी रुग्णालयातील डॉक्टरच्या टीमने तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी घेतली कोरोनाची लस.

- Advertisement -

संजय राऊत यांच्या पत्नी कोरोनाची लागण

संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांनी कोरोनाची बाधा झाली आहे. वर्षा राऊत यांनी फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना सर्दी, ताप, खोकला सुरू असल्याची लक्षण त्यांच्यात होती. दरम्यान संजय राऊत यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने राऊतांना देखील कोरोनाची चाचणी कऱावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.


इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा १४ वा सिझनसुरु होण्यासाठी आता काही दिवसांचाच कालावधी उरला असताना धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. वानखेडे स्टेडियमवर १० एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान आयपीएलच्या १० मॅच होणार आहेत. वानखेडे स्टेडियमवरील सर्व १९ कर्मचाऱ्याची RT-PCR टेस्ट गेल्या आठवड्यात घेण्यात आली होती. यापैकी ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे २६ मार्च रोजी समोर आले होते तर इतर ५ जणांचा कोरोना रिपोर्ट १ एप्रिल रोजी पॉझिटीव्ह आल्याची माहिती स्पोर्ट्सस्टार यांनी दिली.


सदाभाऊ खोत आणि रयत क्रांती मंडळाचं शिष्टमंडळ आज संध्याकाळी ५ वाजता राज्यपालांची भेट घेणार. लॉकडाऊन न करण्याची विनंती राज्यपालांना करण्यासाठी भेट घेणार आहेत. लॉकडाऊन केल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक कामगार, श्रमिकांच्या खात्यावर १० हजार रक्कम जमा करावी. शेतकरी आणि मत्स्यशेती करणाऱ्या मच्छिमारांसाठी आधी उपाययोजना कराव्यात. महाराष्ट्रातील कामगाराला आर्थिक मदत देऊनच लॉकडाऊन जाहीर करावा ही मागणी घेऊन सदाभाऊ खोत, रयत क्रांती मंडळाचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे जाणार आहेत.


एनआयएकडून आणखी एक गाडी ताब्यात

अँटिलिया स्फोटकं प्रकरण- एनआयएकडून आणखी एक गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाची मर्सिडिज गाडी MH 46 X 3420 असून शनिवारी संध्याकाळी एनआयए कार्यालयात आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


अहमदनगरमध्ये कोरोनाचं थैमान; एकाच दिवसात १८०० बाधित

कोरोनाचा कहर राज्यात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होत असलेल्या राज्यातील एक जिल्हा म्हणजे अहमदनगर. अहमदनगरमध्ये शुक्रवारी एका दिवसांत तब्बल १८०० कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्याचे प्रमाण गेल्या चार पाच दिवसांत अधिकच झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी १३०० वर असलेला आकडा गुरुवारी १६०० तर शुक्रवारी थेट १८०० वर जाऊन पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.


राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र अव्वल

राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र अव्वल स्थानी असून १६ ग्रामपंचायतींच्या विविध गटांमध्ये हे पुरस्कार देण्यात आले. केंद्र शासनाचे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये राज्यातील सातारा, गडहिंग्लज (कोल्हापूर),राहता ( अहमदनगर) या पंचायत समित्यांसह राज्याच्या विविध भागांतील १६ ग्रामपंचायतींनी विवध गटांमध्ये पुरस्कार मिळवून महाराष्ट्राचा डंका वाजवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -