घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात गेल्या २४ तासात २६ हजार ६७२ कोरोनाबाधितांची नोंद

Live Update: राज्यात गेल्या २४ तासात २६ हजार ६७२ कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासात २६ हजार ६७२ कोरोनाबाधितांची नोंद

२९,१७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले

- Advertisement -

राज्यात आज ५९४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद


मुंबईत गेल्या २४ तासात १ हजार ४३१ कोरोनाबाधितांची नोंद, ४९ रुग्णांचा मृत्यू

- Advertisement -

२३ मे, संध्या. ६:०० वाजता

२४ तासात बाधित रुग्ण – १४३१

२४ तासात बरे झालेले रुग्ण – १४७०
बरे झालेले एकूण रुग्ण – ६५२६८६
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९३ %

एकूण सक्रिय रुग्ण- २८४१०

दुप्पटीचा दर- ३३१ दिवस
कोविड वाढीचा दर ( १६ मे ते २२ मे)- ०.२० %


सीबीएसई बोर्ड १२ वी परीशेसंदर्भात केंद्रीय स्तरावर बैठक पार पडली या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक आणि इतर केंद्रीय मंत्री देखील होते तसेच सर्व राज्यातील शिक्षणमंत्री व्हिसीद्वारे उपस्थित होते. सर्व राज्यांचे परीक्षेसंदर्भातील सूचना जाणून घेतल्या तसेच २ दिवसांत डिटेल अहवाल पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.


मुंबईतील लसीकरण ७ दिवसात पुर्ण करु शकतो परंतु लसींचा पुरवठा होणे गरजेचे – आदित्य ठाकरे


मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालय केईएमच्या अकाऊंटन्टला पाच कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या संबंधी दोन अकाऊंटन्टवर आरोप ठेवण्यात आला असून एकाला अटक केली आहे तर दुसरा फरार आहे. आरोप करण्यात आलेले हे दोन अकाऊंटन्ट गेली दहा वर्षे झाली ही पैशाची अफरातफर करत असल्याचं समोर आलं आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.


दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


सकाळी सव्वा नऊ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून २.९ रिश्टर स्केलचा भूकंप असल्याचे सांगितले जात आहे. कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांची दिली आहे. यासह साताऱ्याला ३.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला असून ९:१६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे सांगितले जात आहे.


बाल रोग तज्ज्ञ टास्क फोर्सचा राज्यातील बाल रोग तज्ज्ञांशी संवाद

कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राचीच असल्याचं म्हणत त्यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेत पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी आवाहन केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष वेधत जनतेशी संवाद साधला.


कोरोना बाधित संख्या कमी झाल्यास ३१ मेपासून दिल्लीत टप्या-टप्याने अनलॉक करण्यात येईल- अरविंद केजरीवाल


देशात गेल्या २४ तासात २ लाख ४० हजार ८४२ नव्या कोरोना रूग्णांची नोंद तर ३ हजारांहून अधिकांचा कोरोनाने मृत्यू


आज दुपारपर्यंत NEFT सेवा राहणार बंद

कोरोना संसर्गाच्या काळात सर्वाधिक व्यवहार घरात बसून ऑनलाईन ट्रान्झॅक्शनने होत आहेत. व्यावसायिक, बँक आणि असे ग्राहक जे घरबसल्या एनईएफटीचा (NEFT) वापर करत आहेत, मात्र त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच NEFT सेवा आज २३ मे रोजी १४ तासांसाठी बंद राहणार आहे. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ट्विट याबाबत माहिती दिली.RBI ने म्हटलं की, एनईएफटी सर्व्हिसची सेवेची कार्यक्षमता आणि नियमन सुधारण्यासाठी टेक्निकल अपग्रेड केलं जात आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत NEFT सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.


कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार


म्युकरमायकोसिस या आजाराने गेल्या काही दिवसात हजारो लोकं बाधित झाली आहे. आतापर्यंत हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह १४ राज्यांत हा आजार साथीचा रोग जाहीर झाला आहे.


सातारा जिल्ह्यातही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २५ मेपासून ते १ जूनपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. २४ मे रोजी रात्री १२ वाजता लॉकडाऊन सुरु होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, लॉकडाऊन काळात भाजीपाला, फळ मार्केट, किराणा विक्री, उपहारगृह, बार, लॉज सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः राहणार बंद आहेत. तसेच लग्न आणि अंत्यविधीला जाणासाठी आता कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक असणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -