घरताज्या घडामोडीHoli 2021 Live update : राज्यात आज ३१ हजार ६४३ कोरोना रुग्णांची...

Holi 2021 Live update : राज्यात आज ३१ हजार ६४३ कोरोना रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी एकाच दिवसात ४० हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. परंतु सोमवारी गेल्या २४ तासात ३१ हजार ६४३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २० हजारपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


मुंबईत ५८८८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद

- Advertisement -

गेल्या २४ तासात मुंबईत ५८८८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत एकूण ४ लाख ४५ हजार ५६२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी २४ तासात १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला


देहूमधील आंदोलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्यापुरती थांबवले असल्याचे बंडातात्या कराडकर यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

पुन्हा लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमचा आग्रह आहे की, पुन्हा लॉकडाऊन करु नये असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.


मंगळवेढा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीकडून भगीरथ भालकेंना उमेदवारी

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना विधानसभा पोटनिवडणूकीची उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु राष्ट्रवादीमधील काही पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांना उमेदवारी दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित करत विरोध केला आहे.


पुणे शहरातील दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला आहे. आरोपींनी या मुलीला वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त घेऊन जाऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडित मुलीने विरोध केला असता तिच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यामुळेच हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी पाच जणांवर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून ३१ मार्चला पवारांवर एन्डोस्कोपीनंतर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.


धुळवडच्या निमित्ताने शहरात असणार कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. यासह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक धुळवड साजरी करण्यास मनाई करण्यात आली असून सार्वजनिकरित्या कोणी रंग खेळताना दिसल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर याबाबत जमावबंदीचे आदेशही प्रशासनाने काढले आहेत.


बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वराचं मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. मात्र या काळात निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वराची त्रिकाल पूजा आणि नैमित्तिक पूजा सुरु राहणार असल्याचेही सांगितले जात आहे.


देशात गेल्या २४ तासात ६८ हजार ०२१ नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २९१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ३२ हजार २३१ जणांनी कोरोनावर मात केली अजून सध्या त्यांची प्रकृती स्थिर झाली आहे.


राज्यभरासह मुंबईत देखील कोरोनाचा कहर सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मुंबई महापालिकेची चिंता अधिक वाढली आहे. दरम्यान आज २९ मार्च रोजी देशभरात होळी, धुळवड उत्साहात साजरी केली जात आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने मुंबईकरांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. धुलीवंदनाच्या दिवशी असुरक्षित रंग आणि कोरोना, दोन्हीपासून लांब राहूया! सर्व नियमांचे पालन करून मुंबईला सुरक्षित ठेवूया, असे ट्विट देखील मुंबई पालिकेकडून करण्यात आले आहे.


१ एप्रिलपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू, ४५ वर्षांवरील व्यक्तींना दिली जाणार कोरोनाची लस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -