Live Update : अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Live Update Maharashtra Mumbai Politics Maharashtra Politics Uddhav Thackeray Rahul Gandhi Congress BJP NCP Shiv sena Thackeray group Uddhav Thackeray sabha Mumbai Local Indian Politics Congress Priyanka Gandhi

अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंच्या भेटीला


औंरगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारची परवानगी

देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करून दिली माहिती


चिंचवडमध्ये १४ लाखांची रक्कम जप्त

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रक्कम सापडल्याने खळबळ

दळवीनगरमध्ये १४ लाख घेऊन जाणारी कार ताब्यात


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज रात्री ७:३० वाजता मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

उद्धव ठाकरेंकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना चहापानासाठी आमंत्रण


लोकसेवा काय नि निवडणूक आयोग काय, रिझल्ट महत्त्वाचा- एकनाथ शिंदे

रिझल्ट देण्याचं काम देवेंद्र आणि मी करून दाखवू

मोदी साहेबांना हरवणारा कोणी पैदा झालाय का?


MPSC परीक्षार्थी शरद पवारांच्या भेटीला

MPSC च्या विद्यार्थ्यांनी मानले शरद पवारांचे आभार

MPSC चा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार


मासिक पाळीच्या सुट्टीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांना मासिक पाळीमध्ये सुट्टी देण्यात यावी, याबाबत होती याचिका

अधिवक्ता शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी दाखल केली होती जनहित याचिका


नायर रुग्णालयातील सातव्या मजल्यावरून रुग्णाने मारली उडी

सतीश कुमार असे या २८ वर्षीय रुग्णाचे नाव

सतीश नायर रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावर घेत होता उपचार

या घटनेत रुग्ण गंभीर जखमी असून डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहेत


आजपासून छत्तीसगडमधील रायपूरमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाला सुरुवात

हे राष्ट्रीय अधिवेशन पुढील तीन दिवस चालणार


राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणी २१ मार्चला पुढील सुनावणी

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर

२१ मार्चपर्यंत नियुक्त्या करता येणार नाहीत

२१ मार्चपर्यंत कोर्टाचा स्थगिती आदेशही लागू


माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांचे निधन

देवीसिंग शेखावत यांचे पुण्यात झाले निधन


नाशिक येथील चुंचाळे शिवारातील घरकुल योजनेजवळील भंगार दुकानाला आग

पहाटे तीनच्या सुमारास लागली आग

आगीत २५ ते ३० दुकाने जळून खाक

या अग्नितांडवाचा फटका कचरा वेचून गुजराण करणाऱ्या गरीब कुटुंबांना बसला

आगीची माहिती मिळताच नवीन नाशिक, सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल


कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस

आज प्रचारासाठी दोन्ही बाजूचे सर्वोच्च नेते उतरणार मैदानात

कसबा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भिडे पुलापासून पदयात्रा काढणार

चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची संध्याकाळी सभा

कॉंग्रेसचे कसब्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी आदित्य ठाकरे करणार रोड शो

आदित्य ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची चिंचेची तालीम येथे होणार एकत्रित सभा

चिंचवड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी अजित पवार यांचा रोड शो


ICC T20 महिला विश्वचषक 2023 मधील टीम इंडियाचा प्रवास संपला

भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलिया महिला संघाने केला प्रभाव

पहिल्या सेमीफायनल्सच्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून 5 धावांनी पराभूत


पुढील दोन दिवसात महाराष्ट्राच्या तापमानात होणार वाढ

पुणे जिल्ह्यातील तापमानात फेब्रुवारीच्या मध्यातच झाली वाढ


मुंबईकरांना लवकरच करता येणार बेस्टच्या वॉटर टॅक्सीचा प्रवास

जमीन आणि पाणी या दोन्हीकडे धावणाऱ्या वॉटर टॅक्सीच्या पर्यायाची बेस्टकडून चाचपणी सुरु

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या सहकार्याने होणार चाचपणी