घरदेश-विदेशLive Update: राज्यात ८ हजार ९९२ कोरोनाबाधितांची नोंद, २०० जणांचा मृत्यू

Live Update: राज्यात ८ हजार ९९२ कोरोनाबाधितांची नोंद, २०० जणांचा मृत्यू

Subscribe

Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत ५६६ रुग्णांची कोरोनावर मात, ६०० नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत गेल्या २४ तासात १३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

- Advertisement -

राज्यात मागील २४ तासांत ८ हजार ९९२ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून २०० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज १० हजार ४५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


माजी नगरपालिका प्रमुख के. नलिनाक्षन यांचा गंभीर भाजल्यामुळे रुग्णालयात उपाचारादरम्यान निधन झाले आहे. उपचार सुरु असताना मसीना रुग्णालयात अंतिम श्वास घेतला आहे. (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)

- Advertisement -

राज्यात ५ जिल्हा आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्या होत्या पंरतु ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणामुळे या निवडणूका स्थगित करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. निवडणूक स्थगित करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. यानुसार पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)


पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही गर्दी होत असल्यामुळे पर्यटकांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ( सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


मध्यप्रदेशमध्ये मालवाहतूक गाडीचे चाक पुलावरुन जाताना घसरले, अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत


पुण्यातं मेट्रोचं जाळं निर्माण होतयं, १० रुपयांत पुणेकरांना गारेगार प्रवास, प्रदुषण कमी करण्यास होईल मदत, सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा- देवेंद्र फडणवीस


केंद्राकडून राज्यातलं राजकारणं बिघडवण्याचे काम, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिवसेनाचा महापौर बसणार- संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल


केंद्रातील नव्या मंत्र्यांचे अभिनंदन, मी किंवा प्रीतम नाराज नाही, माझ्या नाराजीचे काहीचं कारण नाही,
पक्षाचा निर्णय मला पटलेला आहे, मला वाटत नाही की, भाजपाला मला संपवायचं आहे, आम्ही दोघीही नाराज असण्याचे कारण नाही-  पंकजा मुंडेचं स्पष्टीकरण


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर ८ जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेज वरून रोज देण्यात येईल, असं वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितलं आहे.


सारथीसाठी अजितदादांनी लक्ष केंद्रीत करावं, सारथीसाठी १४ जुलैला महत्त्वपूर्ण बैठक, सारथीच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात, सारथीसाठी १ हजार कोटी जाहीर करावे – संभाजीराजे छत्रपती


MPSC विद्यार्थ्यांचे पुण्यात चक्काजाम आंदोलन, MPSC पदांसाठीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने विद्यार्थ्याचे आंदोलन, मी पण स्वप्नील लोणकरचे बोर्ड घेऊन विद्यार्थ्यांचे आंदोलन, कोणतीही स्थगिती नसतानाही नियुक्त्या का रखडल्या विद्यार्थ्यांचा सवाल.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात नितीन राऊत यांचे केंद्राला पत्र, ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मागणी


ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात पंतप्रधानांची महत्त्वपूर्ण बैठक, ऑक्सिजन पुरवठा आणि उपलब्धतेवर होणार चर्चा


१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराप्रकरणी चौकशीसाठी आयोग नेमण्यात आले आहे. या आयोगाचे कामकाज २ ऑगस्टपासून सुरु होणार असून त्या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत.


नागपूरच्या गोवरी नदीच्या पुरात दोन शेतकरी गेले वाहून, अण्णाजी निंबाळकर आणि प्रविण शिंदे हे दुचाकी वरून जात असताना पुरात वाहून गेले.  पाटण सावंगीला जाणाऱ्या रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे.


वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी आणि पंकजा मुंडेंना धडा शिकवण्यासाठी भागवत कराडांना केंद्रात मंत्रीपद दिल्याचा गंभीर आरोप आज सामानाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. कराडांना केंद्रात मंत्रीपद हा पंकजा मुंडेंना खतम करण्याचा दाव असल्याची जहरी टीकाही सामना अग्रलेखात केली आहे.


कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज (शुक्रवार) दिनांक ९ जुलै २०२१ रोजी लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -