सैफ अली खान हल्ला प्रकरण, आरोपी शरिफुलची ओळख परेड
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण
आरोपी शरिफुलची ओळख परेड पार पडली
5/2/2025 22:17:37
अनिल अंबानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
5/2/2025 21:21:48
दिल्ली निवडणुकीचे एक्झिट पोल समोर
चाणक्य स्ट्रॅटेजीजचा एक्झिट पोल
भाजप- 39-44 जागा
आप- 25-28 जागा
काँग्रेस – 2-3 जागा
पोल डायरीचा एक्झिट पोल
भाजप – 42-50
आप – 18-25
काँग्रेस – 0-2
पीपल्स इनसाइटचा एक्झिट पोल
भाजप – 40-44 जागा
आप – 25-29 जागा
काँग्रेस – 0-1 जागा
पी मार्क एक्झिट पोल
भाजप – 39-49
आप – 21-31
काँग्रेस – 0-1
वी प्रीसाईड एक्झिट पोल
भाजप – 46-52
आप – 18-23
काँग्रेस – 0-1
5/2/2025 19:50:8
शिर्डी – साईबाबा संस्थांचा नवा निर्णय
आता दर्शन रांगेतील भक्तांना मिळणार कूपन
प्रसादालयात जेवणासाठी आता कूपन आवश्यक
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
उद्यापासून होणार निर्णयाची अंमलबजावणी
5/2/2025 19:37:36
पैसे दुप्पट करण्याच्या अमिषाला बळी पडून मॅनेजरनेच बँक लुटली
भंडाऱ्यात ऍक्सिस बँक मॅनेजरने लुटले 5 कोटी रुपये
बँकेतून काढलेली रक्कम तुमसरमधील ड्रायक्लीनर्समध्ये ठेवली
ड्रायक्लीनर्सवरील छापेमारीत भंडारा पोलिसांकडून 5 कोटींची रक्कम जप्त
5/2/2025 19:35:28
दिल्लीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.78 टक्के मतदान
मुस्तफाबाद मतदारसंघात सर्वाधिक 66.68 टक्के मतदान
5/2/2025 17:51:10
मुंबई – नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
ट्रकचा अपघात झाल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी
नाशिकच्या दिशेने वाहनांच्या 2 ते 3 किमी रांगा
5/2/2025 17:25:8
वाल्मिक कराडची ईडी चौकशीसाठी याचिका फेटाळली
मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
5/2/2025 17:22:40
संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयकरचा छापा
पुण्यासह फलटणमधील निवासस्थानीही छापेमारी
सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाकडून चौकशी सुरू
संजीवराजे हे रामराजे निंबाळकरांचे चुलत बंधू
5/2/2025 17:12:21
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सुनावणी
रशिद खान पठाण यांनी दाखल केली होती याचिका
आदित्य ठाकरेंकडूनही स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज दाखल
राशिद पठाण यांच्या याचिकेवर हस्तक्षेप अर्ज दाखल
आपलीही बाजू ऐकून घेण्यासाठी आदित्य ठाकरेंचा अर्ज
न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत
आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का? न्यायालयाचा सवाल
5/2/2025 16:52:48
दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुपारी 03 वाजेपर्यंत 46.55 टक्के मतदान
5/2/2025 15:54:15
आष्टीत उपसा सिंचन योजनेचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून उद्घाटन
उद्घाटनाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे उपस्थित
5/2/2025 13:30:9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टीत पोहोचले
आष्टी उपसा सिंचन योजनेचे मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन
5/2/2025 13:9:32
अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन
पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
5/2/2025 13:2:1
प्रसिद्ध शिव व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरेंची आत्महत्या
शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज
शिरीष महाराजांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट
5/2/2025 12:48:57
शिरोळ तालुक्यात 300 नागरिकांना विषबाधा
शिवकण वाडी गावात महाप्रसादातून विषबाधा
इंदिरा गांधी रुग्णालयात बाधितांवर उपचार सुरू
5/2/2025 12:45:12
वाल्मीक कराडविरोधातील ईडी चौकशीच्या मागणीची याचिका न्यायालयाने फेटाळली
मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली याचिका
5/2/2025 12:1:53
दिल्लीत सकाळी 11 वाजेपर्यंत 19.95 टक्के मतदान
5/2/2025 11:43:50
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमृतस्नानाला सुरुवात
त्रिवेणी संगमावर पंतप्रधान मोदींचे अमृतस्नान
5/2/2025 11:26:53
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज येथील संगमावर पोहोचले
विशेष बोटीतून पंतप्रधान मोदी स्नान करण्यासाठीच्या ठिकाणी रवाना
5/2/2025 10:47:36
पुण्यातील बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड
अप्पर इंदिरानगर, दुर्गामाता गार्डन परिसरातील वाहनांची तोडफोड
तोडफोडीप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना घेतले ताब्यात
5/2/2025 9:50:32
दिल्लीत सकाळी 09 वाजेपर्यंत 8.10 टक्के मतदान
5/2/2025 9:41:7
संजीवराजे निंबाळकरांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे
संजीवराजे निंबाळकर हे रघुनाथराजे निंबाळकरांचे चुलतबंधू
संजीवराजे यांची अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू
5/2/2025 9:37:18
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाकुंभमेळ्यात
महाकुंभात आज पंतप्रधान मोदी पवित्र स्नान करणार
पवित्र स्नानानंतर ते गंगा पूजन करणार असल्याची माहिती
5/2/2025 8:38:23
राहुल गांधींनी बजावला मतदानाचा हक्क
काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दिल्लीतील मतदार
5/2/2025 8:30:14
दिल्लीत आज विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान
तब्बल 1.56 कोटी मतदार 699 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार
70 विधानसभा मतदारसंघातील 13 हजार 766 मतदान केंद्रांवर मतदान
मतदान शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने निमलष्करी दलाच्या 220 कंपन्या, दिल्ली पोलिसांचे 35 हजार 656 जवान आणि 19 हजार होमगार्ड तैनात
सुरक्षेसाठी राजधानी दिल्लीत 42 ड्रोन तैनात
5/2/2025 8:26:7
10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यातील काही संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय
राज्यातील दहावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार
बोर्ड परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार
परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची (FCR) Facial Recognition System व्दारे म्हणजे फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार
5/2/2025 8:26:7
भारत वि. इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेला गुरुवारपासून सुरुवात
दोन्ही संघांमधील पहिला एकदिवसीय सामना गुरुवारी नागपुरात खेळविण्यात येणार
या मालिकेत दोन्ही संघात चांगली चुरस पाहायला मिळू शकते
5/2/2025 8:26:7