Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशLive Update : भिवंडीतील गुंदवली गावच्या हद्दीतील भंगाराच्या गोदामाला भीषण आग

Live Update : भिवंडीतील गुंदवली गावच्या हद्दीतील भंगाराच्या गोदामाला भीषण आग

Subscribe

भिवंडीतील गुंदवली गावच्या हद्दीतील भंगाराच्या गोदामाला भीषण आग

आगीत चार भंगार गोदामे आणि 6-7 पत्र्याच्या झोपड्या जळाल्या

भंगाराच्या गोदामाला लागलेल्या आगीचे कारण अस्पष्ट

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

21/2/2025 17:41:9


पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर

नऊ हजार 675 कोटी 27 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर

मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी प्रशासक शेखर सिंह यांना अर्थसंकल्प सादर केला

प्रशासकांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत कोणतीही करवाढ-दरवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केलाआगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडकरांना करवाढीपासून दिलासा

21/2/2025 17:21:29


जालन्यात एसटी बसने 6 प्रवाशांना चिरडले

ब्रेक फेल झाल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडली घटना

अपघातात दोघांचा मृत्यू, 4 जणांवर उपचार सुरू

जालन्यातील अंबड बस स्थानकातील घटना

21/2/2025 16:54:35


दिल्लीत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे

21/2/2025 16:52:34


काँग्रेसचे माजी आमदार सोहोसराम कोरोटेंचा शिंदे गटात प्रवेश

कोरोटेंसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

21/2/2025 15:49:47


पुणे विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात सापडल्या अळ्या

विद्यार्थ्यांच्या 8 नंबरच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार

जेवणात वारंवार अळ्या, झुरळ सापडत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

घटनेनंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मेस बंद पाडली

21/2/2025 15:12:21


न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणातील तीन आरोपींना पोलीस कोठडी

अटकेत असलेल्या तीन आरोपींना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

21/2/2025 15:9:6


मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पालिका आयुक्तांच्या भेटीला

मुंबईतील विविध विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी ठाकरे आयुक्तांच्या भेटीला गेल्याची माहिती

21/2/2025 14:33:51


एसटी प्रवासात महिला, ज्येष्ठांना मिळणारी सवलत रद्द होणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे

प्रवाशांना दिलेले वचन आम्ही पाळणार – उपमुख्यमंत्री शिंदे

ज्येष्ठ आणि महिलांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात, सरनाईक यांचे विधान

21/2/2025 13:53:25


पहिल्याच दिवशी कॉपी मुक्त अभियानाचा बट्ट्याबोळ

जालन्यातील तळणी गावात कॉपी पुरवण्यासाठी गर्दी

तसेच, बदनापूरमध्येही पेपर सुरू झाल्यावर काही वेळातच उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स

21/2/2025 13:49:13


विकिपीडियाच्या 4 ते 5 एडिटर्सवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र सायबर सेलची कारवाई

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह माहिती प्रसिद्धी केल्याचे प्रकरण

21/2/2025 13:28:47


सायबर सुरक्षेसाठी राज्य सरकार स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार

वर्षातून एकदा सर्व कंपन्यांना सायबर ऑडीट करून घ्यावे लागणार

कंपन्यांनी ऑडीट न केल्यास रोज 25 हजार रुपयांचा दंड

21/2/2025 13:26:47


आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह 20 जणांवर गुन्हे दाखल

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेल्या ग्रेटा कंपनीच्या विरोधात आंदोलन

शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह 20 जणांवर गुन्हे दाखल
आमदार अडबाले यांच्या नेतृत्वात स्थानिकांच्या मागण्यांसाठी घेतलेल्या बैठकीत उपस्थितांनी भडकाऊ भाषणे केल्याचा ठपका

21/2/2025 12:42:58


राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज पहिली बैठक

सुनील तटकरे यांनी बोलावली कोअर कमिटीची बैठक

21/2/2025 12:42:1


बीड – मनोज जरांगे मस्साजोगमध्ये

देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांशी मनोज जरांगेंची चर्चा

मस्साजोग ग्रामस्थ 25 फेब्रुवारीला अन्नत्याग आंदोलन करणार

21/2/2025 12:0:22


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धमकी प्रकरण, दोन अटकेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र

मुंबई गुन्हे शाखेकडून दोन जणांना अटक

आरोपींना बुलढाणा पोलिसांच्या मदतीने अटक

दोन्ही आरोपी बुलढाणाच्या देऊळगावचे रहिवासी

21/2/2025 10:18:57


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरुवात

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीमध्ये सुप्रिया सुळेंची हजेरी

21/2/2025 10:12:16


राज ठाकरे घेणार मनपा आयुक्तांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील विविध विषयांबाबत करणार चर्चा

21/2/2025 10:1:0


सीएसएमटी ते मडगाव आणि एलटीटी ते मडगाव विशेष ट्रेन

होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या

तिकीट आरक्षण 24 फेब्रुवारीपासून करता येणार

21/2/2025 9:43:56


कोल्हापूरमध्ये जीबीएसचा तिसरा बळी

कोल्हापूर शहरातील 80 वर्षाच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

गेल्या दहा दिवसापासून त्यांच्यावर सुरू होते उपचार

जीबीएसवर शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 12 वर

21/2/2025 9:18:36


आजपासून तीन दिवस दिल्लीत मराठी साहित्याचा महामेळा

आजपासून दिल्लीत 98 वे मराठी साहित्य संमेलन

डॉ. तारा भवाळकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष

पंतप्रधानांच्या हस्ते आज संमेलनाचे उद्घाटन तर शरद पवार स्वागताध्यक्ष

आज पंतप्रधान मोदी, शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर दिसणार

21/2/2025 7:42:51


भारतीय वंशाचे काश पटेल अमेरिकेच्या FBIचे संचालक

सिनेटकडून 51 विरुद्ध 49 मतांनी शिक्कामोर्तब

21/2/2025 7:35:40


आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षांना सुरुवात

राज्यात 16 लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार

21/2/2025 7:28:45