IND vs PAK – भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
विराट कोहलीचे शेवटच्या चेंडूवर शानदार शतक
भारताने पाकिस्तानवर केली 6 विकेट्सनी मात
23/2/2025 21:52:46
IND vs PAK – श्रेयस अय्यरचे 21 वे अर्धशतक
विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी
भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर
23/2/2025 21:21:56
IND vs PAK – विराट कोहलीचे 74 वे एकदिवसीय अर्धशतक
63 चेंडूंमध्ये पाकिस्तानविरोधात पूर्ण केले अर्धशतक
आयसीसी स्पर्धांमध्ये तब्बल 23 वेळा केल्या 50 हून अधिक धावा
23/2/2025 20:42:45
भारतीय संघाला दुसरा धक्का, गिल 46 वर बाद
शुभमन गिल 46 धावांवर बाद, अबरार अहमदने काढली विकेट
23/2/2025 20:11:8
सिंधुदुर्ग – दोडामार्ग तालुक्यात गारांसह अवकाळीची हजेरी
अवकाळीमुळे काजू उर्पादक चिंतेत
23/2/2025 19:52:58
वडाळा परिसरात हिट ऍंड रनची घटना
फुटपाथवर झोपलेल्या माय-लेकाला गाडीने चिरडले
अपघातात 18 महिन्याच्या मुलाचा जागीच मृत्यू
अपघातात महिला गंभीर जखमी
कमल रिया असे वाहनचालक महिलेचे नाव
23/2/2025 19:28:10
IND vs PAK – सलामीवीर म्हणून रोहित शर्माच्या 9 हजार धावा
भारतीय संघासमोर 242 धावांचे आव्हान
23/2/2025 18:56:32
नीलम गोऱ्हेंविरोधात मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
शिवसेना ठाकरे गटाचे नीलम गोऱ्हेंच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आंदोलन
माजी महापौर किशोरी पेडणेकरही आंदोलनात सहभागी
23/2/2025 18:51:26
IND vs PAK : पाकिस्तानचा संघ 241 धावांवर सर्वबाद
23/2/2025 18:21:17
IND vs PAK : पाकिस्तानला आठवा धक्का, नसीम शहा 14 धावांवर बाद
कुलदीप यादवने घेतली सामन्यातील तिसरी विकेट
23/2/2025 18:7:41
पाकिस्तानाचा सहावा झटका, सलमान आगा 19 वर बाद
रवींद्र जडेजाने घेतली सलमान आगाची विकेट
23/2/2025 17:46:30
165 वर पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत
तयब ताहीर 4 धावांवर बाद
हार्दिक पांड्याने घेतल्या 2 विकेट, तर अक्षर पटेल, रवींद्र जडेजाच्या प्रत्येकी 1 विकेट
23/2/2025 17:27:28
IND vs PAK – सउद शकील हार्दिक पांड्यासमोर फेल, 62 धावांवर बाद
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर शकीलचा अक्षर पटेलकडे झेल
पाकिस्तानचा संघ 159 धावांवर 4 बाद
23/2/2025 17:20:18
पुणे – पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन
नीलम गोऱ्हेंविरोधात आंदोलन करताना कार्यकर्त्ये आणि पोलिसांमध्ये झटापट
23/2/2025 17:17:16
IND vs PAK : अक्षर पटेलने काढली रिझवानची विकेट
शतकी भागीदारी करणारी पाकिस्तानची जोडी अक्षर पटेलने तोडली
कर्णधार मोहम्मद रिझवान 46 धावांवर त्रिफळाचीत
23/2/2025 17:9:57
IND vs PAK : पाकिस्तानच्या सउद शकीलचे अर्धशतक
तिसऱ्या विकेटसाठी पाकिस्तानकडून सउद शकील आणि कर्णधार मोहम्मद रिझवानची 90 धावांची नाबाद भागीदारी
23/2/2025 16:54:6
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात पुण्यात शिवसेना ठाकरे गट पक्षाचे आंदोलन
नीलम गोऱ्हे यांच्या केलेल्या विधानाचा विरोध
23/2/2025 16:22:18
गोऱ्हेंच्या विधानावरून साहित्य महामंडळाने माफी मागावी – संजय राऊत
संजय राऊत यांचे संमेलन अध्यक्ष उषा ताबेंना खरमरीत पत्र
साहित्य संमेलनाचे राजकीय व्यासपीठ कोणी केले? संजय राऊत यांचा सवाल
23/2/2025 16:9:34
गणेश नाईक यांचा उद्या ठाण्यात जनता दरबार
गणेश नाईक अधिकाऱ्यांसोबत जनता दरबार घेणार
जनता दरबाराआधी भाजपकडून ठाणे शहरात जनता दरबाराचे पोस्टर्स
23/2/2025 15:46:56
पाकिस्तानचा दुसरा गडी बाद, इमाम उल हक धावचीत
अक्षर पटेलचा अचूक नेम, इमाम उल हक 10 धावांवर वाद
पाकिस्तानचा संघ 10 षटकांमध्ये 52 धावांवर 2 बाद अशी अवस्था
23/2/2025 15:24:36
IND vs PAK : पाकिस्तानला पहिला धक्का, बाबर 23 धावांवर बाद
हार्दिक पांड्याच्या माऱ्यासमोर बाबर आझम झेलबाद
23/2/2025 15:15:12
भारत-पाकिस्तान सामन्याला सुरुवात
पाकिस्तानचा फलंदाजी करण्याचा निर्णय
23/2/2025 14:27:2
चॅम्पियन ट्रॉफीच्या भारत वि. पाक सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने घेतला फलंदाजीचा निर्णय
भारताची प्रथम गोलंदाजी
23/2/2025 14:3:21
काँग्रेसच्या किरण काळेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
किरण काळे काँग्रेसचे अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख
23/2/2025 13:8:12
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री शिंदे आज मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोमवारी प्रयागराजला जाणार
23/2/2025 11:42:15
आज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भारत-पाक मुकाबला
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळण्यात येणार सामना
दुपारी 2.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार
आठ वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीत भिडणार
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचे पारडे जड असले तरी कट्टर विरोधक असलेल्या पाकिस्तानसोबतचा आजचा विजय महत्त्वाचा ठरणार
23/2/2025 8:24:39
वसई पूर्व येथे दोन दुचाकींच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
वसई पूर्व येथील मधुबन परिसरात शनिवारी रात्री दोन दुचाकींचा भीषण अपघात
मोकळा रस्ता असल्याचे बघून या दुचाकी जोरदार पळविण्यात आल्या होत्या, त्याचवेळी हा अपघात घडल्याची माहिती
भरधाव वेगात असलेली एक्टिवा गाडी तसेच एक दुचाकी समोर समोर धडकल्याने हा अपघात
23/2/2025 8:24:39