दिल्लीतील भाजप सरकारच्या निर्णायावर ठाकरे गट आक्रमक
भाजपने महापुरुषांचा अपमान करण्याची फॅशनच बनवलीय – शिवसेना ठाकरे गट
कधी महापुरुषांबद्दल अपशब्द, तर कधी त्यांच्या स्मारकात घोटाळा
आता दिल्लीत सरकार आल्याबरोबर मुख्यमंत्री कार्यालयातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिकारक भगतसिंग ह्यांचे फोटो काढून टाकण्यापर्यंत भाजपची मजल गेली
25/2/2025 22:46:56
नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचे एकनाथ शिंदेंकडून समर्थन
नीलम गोऱ्हे जे बोलल्या ते अगदी योग्य होते – एकनाथ शिंदे
त्या ज्या व्यासपीठावरुन बोलल्या ते योग्य होते की चुकीचे हा नंतरचा विषय
25/2/2025 22:0:50
राज्य सरकारकडून पुन्हा सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आयएएस अधिकारी दीपक कुमार मीना यांची राज्य कर विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती
महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर यांची पुणे सारथीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती
25/2/2025 18:52:53
छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार जाहीर
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादी मी अनंत मी… गीताला पुरस्कार जाहीर
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी केली पुरस्काराची घोषणा
स्वातंत्र्यवीर सावरकरांची बुधवारी पुण्यतिथी
25/2/2025 18:21:44
कल्याण-डोंबिवली पालिकेची अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई
बेकायदा बांधकामावरून सहाय्यक आयुक्त निलंबित
सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे निलंबित
बेकायदा बांधकामे रोखण्यात अपयश आल्याने कारवाई
25/2/2025 17:45:39
इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
25/2/2025 17:41:5
मंत्रालयात पत्रकारांचे ठिय्या
पोलिसांकडून धक्काबुक्की होत असल्याने पत्रकार आक्रमक
पत्रकारांच्या निषेधानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतील पोलीस अधिकाऱ्यांची भेट
धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांनी माफी मागण्याची पत्रकारांची मागणी
25/2/2025 17:31:3
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांवर
01 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 असा महागाई भत्त्याचा कालावधी असेल
25/2/2025 17:5:50
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी
आज कोर्टाने सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतली
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली सुनावणी
या प्रकरणावरील अंतिम निर्णयावर 1 मार्चला सुनावणी होणार
25/2/2025 16:54:49
मंत्रालयात तरुणाचे आंदोलन
आईच्या हत्याप्रकरणी न्याय मिळत नसल्याने तरुणाचे आंदोलन
मंत्रालयातील जाळीवर उतरुन तरुणाचे आंदोलन
25/2/2025 16:13:30
गुंड गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
गजा मारणेच्या नावावर एकूण 28 गुन्ह्यांची नोंद
25/2/2025 15:31:15
मराठा आंदोलक मनोज जरांगे मस्साजोगमध्ये पोहोचले
मस्साजोगमधील ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन
मनोज जरांगे यांनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट
25/2/2025 15:27:34
आम आदमी पक्षाचे 21 आमदार 3 दिवसांसाठी निलंबित
दिल्ली विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर 21 आमदारांवर कारवाई
विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी आमदारांना तीन दिवसांसाठी केले निलंबित
25/2/2025 15:20:19
खासदार सुप्रिया सुळेंचा धनंजय देशमुखांना फोन
मस्साजोगमध्ये संतोष देशमुख हत्याकांडाच्या तपासासाठी गावकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन
खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना फोन
सुप्रिया सुळेंनी धनंजय देशमुखांच्या प्रकृतीची विचारपूस केली
25/2/2025 14:37:5
काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेप
1984 च्या सरस्वती विहार हिंसा प्रकरणात जन्मठेप
1984 च्या शीख दंगलप्रकरणी सज्जन कुमार यांना जन्मठेप
25/2/2025 14:10:49
महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता
राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार
बारामती, परळीत पशुवैद्यक महाविद्यालय होणार
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 ला मान्यता
25/2/2025 13:11:45
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी पुन्हा लांबणीवर
4 मार्चला सुनावणी घेण्यावर संध्याकाळी होणार निर्णय
25/2/2025 13:2:50
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांकडून कॅगचा अहवाल सादर
आप सरकारमध्ये 2 हजार 26 कोटींचे आर्थिक नुकसान
मद्य धोरण, शीशमहलबाबत कॅगचा अहवाल
एकाच कंपनीला ठोक, किरकोळ, हॉटेलचे परवाने दिल्याचे कॅगचा अहवालात सांगितले
25/2/2025 12:56:33
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात
मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री धनंजय मुंडे आणि कोकाटे गैरहजर
25/2/2025 12:36:11
इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन
प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून धमकी
प्रशांत कोरटकर यांनी नाकारले आरोप
25/2/2025 11:52:5
दिल्ली विधानसभेत दुसऱ्या दिवशी देखील गोंधळ
विरोधी पक्षनेता आतिशी यांच्यासह आपचे 11 आमदार दिवसभरासाठी निलंबित
25/2/2025 11:48:6
चूक झाल्याची रणवीर अलाहाबादियाची पोलिसांकडे कबुली
इंडियाज गॉट लेटेंट कार्यक्रमामधील विधानाप्रकरणी चौकशीत कबुली
या कार्यक्रमासाठी पैसे घेतले नसल्याचीही अलाहाबादियाने दिली माहिती
25/2/2025 11:43:26
इंद्रजित सावंतांना मी धमकी दिली नाही – प्रशांत कोरटकर
इतिहासकार इंद्रजित सावंतांना प्रशांत कोरटकर यांच्या नावाने आला धमकीचा फोन
धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा, इंद्रजित सावंतांची माहिती
25/2/2025 11:36:9
राऊतांनी नीलम गोऱ्हेंबाबत केलेल्या विधानावरून शिवसेनेचे आंदोलन
नीलम गोऱ्हेंबाबत केलेल्या विधानावरून संजय रात यांच्याविरोधात आंदोलन
पुण्यामधील अलका चौकात आंदोलन करत दिल्या घोषणा
25/2/2025 11:32:13
नाशिक कुंभमेळ्यासंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक
दोन वर्षानंतर नाशिकमध्ये होणार कुंभमेळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
मंत्री गिरीश महाजनांनी बोलावली बैठक
25/2/2025 11:19:57
बीडमधील मस्साजोगच्या ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन
मनोज जरांगे आज मस्साजोगमधील आंदोलकांची भेट घेणार
अन्नत्याग आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी
25/2/2025 10:7:5
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी
आजपासून फेब्रुवारीचा हप्ता देण्यास सुरुवात
फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार
महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती
25/2/2025 9:28:5
शरद पवार यांचा नांदेड – हिंगोली दौरा रद्द
शरद पवार यांचा तिसऱ्यांदा दौरा रद्द
25/2/2025 9:16:51
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध
महाशिवरात्रीनिमित्त शिवस्तुती नृत्याविष्कार कार्यक्रम रद्द करण्याची मागणी
मंदिर विश्वस्थांकडून कार्यक्रमाचे आयोजन, पण माजी विश्वस्थांचा विरोध
माजी विश्वस्थ ललिता शिंदे यांचे ग्रामीण पोलिसांना पत्र
चुकीचा पायंडा पाडू नये, ललिता शिंदे यांची मागणी
25/2/2025 8:52:36
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकीचा फोन
प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून धमकी
इंद्रजीत सावंतांना घरात शिरून जीवे मारण्याची धमकी
25/2/2025 8:41:50
कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणी वैभव गायकवाडला क्लीन चीट
गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडला क्लीन चीट
आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश
25/2/2025 8:37:3
परभणी जिल्ह्यातील सेलूत कृषी विभागाचे 7 अधिकारी निलंबित
उपविभागीय कृषी अधिकारी ते पर्यवेक्षकांपर्यंतचे 7 जण निलंबित
समृद्धी महामार्गात जाणाऱ्या वृक्षाचे चुकीच्या पद्धतीने वाढीव मुल्यांकन
तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केली होती चौकशी
चौकशीनंतर 7 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
25/2/2025 8:24:30
शिवसेना ठाकरे गटाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक
शिवसेना भवनात दुपारी 3 वाजता होणार बैठक
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकींचे आयोजन
25/2/2025 8:20:40
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार
दुपारी 12 वाजता पार पदंदर मंत्रिमंडळाची बैठक
25/2/2025 8:0:51
पालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
25/2/2025 7:59:33
लग्न जमत नसल्याने तरुणाची आत्महत्या
हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील घटना
25/2/2025 7:43:13
मस्साजोग ग्रामस्थांचे आजपासून अन्नत्याग आंदोलन
आज सकाळी 10 वाजल्यापासून ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन
फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या अटकेची मागणी
हत्येला 77 दिवस उलटूनही सर्व आरोपींना अद्याप अटक नाही
25/2/2025 7:33:53
आता स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून युद्धनौका पर्यटकांना पाहता येणार
आयएनएस गुलदार युद्धनौका विजयदुर्ग खाडीत स्थिरावणार
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ चार पाणबुड्या विकत घेणार
25/2/2025 7:25:26