स्वारगेट अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
पोलिसांकडून तात्काळ कारवाईची केली मागणी
26/2/2025 20:55:31
स्वारगेट बस स्थानकात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने
ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी
26/2/2025 20:0:35
महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले 6 जण बुडाले
चंद्रपूरमधील तीन सख्या बहिणींचा मृत्यू
26/2/2025 20:0:8
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेला रुग्णालयातून डिस्चार्ज
24 तास निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर तरुणीला डिस्चार्ज
स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झाला होता अत्याचार
26/2/2025 19:58:50
महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करा – सुरेश धस
भाजप आमदार सुरेश धसांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्रातून मागणी
3 मार्च पासून महादेव मुंडेंच्या पत्नीचा आमरण उपोषणाचा इशारा
26/2/2025 18:26:16
23 सुरक्षा रक्षकांचे निलंबन केल्यानंतर नवे सुरक्षारक्षक रुजू होणार
उद्यापासून नवे सुरक्षारक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कारवाई
26/2/2025 18:14:54
आरोपीला तात्काळ अटक करण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आदेश
23 सुरक्षा रक्षकांचे निलंबन केल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
26/2/2025 18:12:0
जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे शिवसेनेत प्रवेश करणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार सोनवणे यांचा पक्षप्रवेश
26/2/2025 17:29:53
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे गैरहजर
मुख्यमंत्र्यांसह सुजाता सौनिक, महाजनांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
26/2/2025 17:16:31
मस्साजोग ग्रामस्थांची 1 मागणी सरकारकडून मान्य
भाजपचे आमदार सुरेश धस यांची माहिती
महाजन गुन्हेगारी प्रवृत्तीचा पोलीस अधिकारी – सुरेश धस
महाजन, पाटील यांना सहआरोपी करावे – सुरेश धस
26/2/2025 16:58:28
मस्साजोगचे अन्नत्याग आंदोलन स्थगित
बीडमधील मस्साजोगच्या ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन अखेर मागे
26/2/2025 16:35:50
शिवसेना ठाकरे गटाचे वसंत मोरे यांची स्वारगेट बस स्थानकाची तोडफोड
पुणे स्थानकामध्ये झालेल्या अत्याचारानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक
26/2/2025 16:15:43
पाच दिवसांनंतर महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा सुरू
कर्नाटकातून पहिली बस कोल्हापुरात पोहोचली
कोल्हापूर-बेळगाव बससेवा सुरू
26/2/2025 15:48:17
अभिनेत्री प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर येथील कार्यक्रमाला जाणार नाही
आज महाशिवरात्रीनिमित्त प्राजक्ताचा त्र्यंबकेश्वर मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम होणार होता
26/2/2025 15:9:50
जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये दहशतवाद्यांचा लष्कराच्या वाहनावर गोळीबार
आतंकवाद्यांना शोधण्याची मोहीम सुरू
26/2/2025 14:6:54
Afg vs Eng : नाणेफेक जिंकून अफगाणिस्तान संघाचा फलंदाजीचा निर्णय
26/2/2025 14:6:18
पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार
स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत 26 वर्षीय तरुणीसोबत घटना घडल्याची माहिती
पहाटे 5.30 वाजता स्वारगेट एसटी स्टँडवर धक्कादायक घटना घडल्याची माहिती
या घटनेतील फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू
26/2/2025 12:32:27
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती
26/2/2025 10:36:31
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या कोरटकरांच्या घरासमोर आंदोलन
प्रशांत कोरटकर यांनी शिवरायांची बदनामी केल्याचा आंदोलकांचा आरोप
सकल मराठा संघटनेचे प्रशांत कोरटकरांच्या घरासमोर आंदोलन
26/2/2025 10:16:22
महाकुंभमेळ्याचा आजचा शेवटचा दिवस
महाकुंभात आजचे शेवटचे शाही स्नान
आज तब्बल अडीच कोटी भाविक पवित्र स्नान करण्याची शक्यता
मकरसंक्रांतीपासून सुरू झालेल्या महाकुंभाची आज सांगता
26/2/2025 9:45:24
सलग पाचव्या दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा बंद
आज रात्री किंवा उद्या एसटी सेवा सुरू होण्याची शक्यता
कोल्हापुरातून आजही एसटी सेवा बंदच
26/2/2025 9:38:44
देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह
देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
त्र्यंबकेश्वर, बनेश्वर आणि कपिलेश्वर यासारख्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये लाखो भाविक दर्शन घेणार
शिवरात्रीनिमित्ताने शिवमंदिरांना रोषणाई
मंदिरांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
भाविकांच्या सुकर दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष उपाययोजना
26/2/2025 8:15:27
महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा
महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
गेन बिटकॉईन हे सॉफ्टवेअर मे. व्हेरिएबल टेक प्रा. लि. या कंपनीकडे होते.
या बिटकॉईनच्या सॉफ्टवेअरचे प्रमोशन करण्यासाठी दुबईत एका मोठ्या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते.
2017 मध्ये याप्रकरणात नांदेडमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नांदेडमधील अनेक व्यापारी, डॉक्टर आणि उद्योजकांनी 2017 मध्ये गेन बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली होती.
मंगळवारी सीबीआयने पुणे, नांदेड, कोल्हापूरसह दिल्ली आणि बंगळुरु या शहरांमध्ये तब्बल 60 ठिकाणी टाकली धाड
26/2/2025 8:15:27