महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नांबाबत समन्वयमंत्री नियुक्त
मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांची नियुक्ती
सीमाभागातील मराठी बांधवांचे प्रश्न जाणून घेण्याची जबाबदारी
28/2/2025 21:21:56
स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 12 दिवसांची पोलीस कोठडी
घटनेनंतर तब्बल 70 तासांनी पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी आरोपीचा घेतला होता शोध
पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी दत्ता गाडेला शिवाजीनगर जिल्हा न्यायालयासमोर केले हजार
28/2/2025 19:11:19
मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत
28/2/2025 18:50:4
आरोपी दत्ता गाडेला घेऊन पोलीस न्यायालयाकडे रवाना
28/2/2025 18:6:28
3 मार्च ते 7 मार्च दरम्यान रायगडवरील रोपवे बंद राहणार
देखभाल आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी रोपवे बंद राहणार
28/2/2025 17:52:52
पुणे कोर्ट परिसरात राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमले
आरोपीवर बांगड्या फेकण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न
काही महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
28/2/2025 17:25:32
राष्ट्रवादी शरद पवार गटाची शॅडो कॅबीनेट
राज्य सरकारच्या 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवणार
शरद पवारांच्या शॅडो कॅबीनेटमध्ये अनेक नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभर विभागीय प्रभारींची नेमणूक
28/2/2025 17:16:39
मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न
बैठकीत पक्ष संघटना वाढीवर चर्चा झाल्याची माहिती
पक्षावाढीसाठी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारी
जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे रोहित पवारांवर पक्षाकडून जबाबदारी
28/2/2025 16:40:59
शिवसेना ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांना देणार पत्र
शिवसेना ठाकरे गट आज किंवा उद्या स्मरणपत्र देणार
ठाकरे गटातील आमदारांच्या सह्याचे पत्र देणार
विधानसभा विरोधी पक्षनेतापदाबाबत बातमी
28/2/2025 15:22:11
हिमाचल प्रदेशातील सततच्या पावसामुळे बद्रीनाथमध्ये ग्लेशियर तुटला
बर्फाखाली 40 मजूर अडकल्याची माहिती
28/2/2025 13:54:49
पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे आंदोलन
काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी
आरोपी दत्तात्रय गाडे सध्या लष्कर पोलीस ठाण्यामध्ये
आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी
28/2/2025 13:6:56
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
हिमाचल प्रदेशात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस
पावसामुळे राज्यातील अनेक भागात भूस्खलन
राज्यातील नद्या आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ
सततच्या पावसामुळे कुल्लूचा संपर्क तुटला
28/2/2025 12:49:23
EPFO चा व्याजदर 8.25 टक्क्यांवर कायम
EPFO 2024-25 च्या बैठकीत घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय
28/2/2025 12:44:6
अलिबागमध्ये भर समुद्रात बोटीला आग
बोटीत 15 ते 20 प्रवासी असल्याची माहिती
बोटीतील सर्व प्रवासी सुखरूप
आगीमध्ये बोट जळून खाक
28/2/2025 12:10:6
आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची पोलिसांना शंका
आरोपी दत्तात्रय गाडेच्या मानेवर दोरखंडाचे व्रण – पुणे पोलीस आयुक्त
स्वारगेट प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा प्रयत्न – पोलीस आयुक्त
पुण्यातील सर्व ठिकाणांचा पोलिसांकडून ऑडिट सुरू
28/2/2025 11:25:37
कोल्हापूर राजाराम साखर कारखान्यातील बगॅसला भीषण आग
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती चेअरमन अमल महाडिकांनी दिली
28/2/2025 11:15:8
भायखळ्यातील इमारतीत भीषण आग
निर्मल पार्क इमारतीत भीषण आग
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या
निर्मल पार्क ही रहिवासी इमारत
28/2/2025 11:4:7
मुंबईतील तापमानात वाढ
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात वाढ
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट
28/2/2025 10:26:42
सेबीच्या अध्यक्षपदी तुहिन कांत पांडे यांची निवड
तुहिन कांत पांडे यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार
सेबीच्या विद्यमान अध्यक्षा माधवी पुरी बुच उद्या निवृत्त होणार
28/2/2025 10:12:51
सेन्सेक्स 900 हून अधिक अंकांनी कोसळला
निफ्टीही 250 हून अधिक अंकांनी कोसळला
बँकिंग, आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग कोसळले
बीएसई मार्केट कॅप 6 लाख कोटींनी घसरली
28/2/2025 10:3:35
ठाकरे गटाच्या आमदारांची आज मातोश्रीवर बैठक
संघटना मजबूत करण्यासाठी बैठक बोलावण्यात आल्याची माहिती
विधानसभा विरोधी पक्षनेत्याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
28/2/2025 9:44:2
आरोपी दत्तात्रय गाडेला शिवाजी नगर कोर्टात हजर करण्यात येणार
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री 1.30 च्या सुमारास अटक
आरोपीला शिरूरमधील गुणाट गावातून अटक
28/2/2025 8:32:6
नेपाळमध्ये बसले भूकंपाचे धक्के
नेपाळमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप
नेपाळसोबतच बिहारमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के
कालच आसाम येथे बसले होते भूकंपाचे धक्के
नेपाळमध्ये आणि बिहारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
28/2/2025 8:22:37
उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकराकडून हत्या
लग्नाचा तगादा लावत असल्याने प्रियकरानेच हत्या केल्याचे पोलीस तपासामध्ये उघड
मुंबई पोलीस गुन्हे शाखा 3 च्या पथकाने अवघ्या एका दिवसात लावला हत्येचा छडा
28/2/2025 8:22:37