चार महिला नक्षलवादी चकमकीत ठार
पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत चार महिला नक्षलवादी ठार
बालाघाट झोनचे पोलिस महासंचालक संजय सिंह यांनी दिली माहिती
20/2/2025 21:52:47
IND VS BAN : भारताचा बांग्लादेशवर 6 विकेट्सने विजय
भारताने 46.3 षटकात केल्या 231 धावा
20/2/2025 21:46:13
IND VS BAN : शुभमन गिलचे शतक
125 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने केल्या 100 धावा
20/2/2025 20:50:53
गोरेगाव फिल्मसिटी परिसरात आग
नागरमोडी पाड्यातील आंबेवाडीच्या झोपडपट्टीमध्ये आग
अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल
20/2/2025 19:21:22
मुंबई विमानतळावर 56 कोटींचा गांजा जप्त
कस्टम विभागाने कारवाई करत 5 जणांना घेतले ताब्यात
बँकॉकवरून आलेल्या 5 जणांना अटक
20/2/2025 19:6:4
अभिजित पवारांची दोन दिवसात घरवापसी
दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला होता पक्षप्रवेश
20/2/2025 18:31:21
दिल्लीत शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर
‘संसदभवन ते सेंट्रल विस्टा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला दोन्ही नेते उपस्थित
20/2/2025 18:29:31
IND VS BAN : भारतासमोर 229 धावांचे आव्हान
मोहम्मद शमीच्या पाच विकेटच्या जोरावर बांग्लादेश संपूर्ण संघ बाद
तौहिद हृदयॉयने 114 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने केल्या 100 धावा
झाकीर अलीने 114 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने केल्या 68 धावा
20/2/2025 16:53:39
कल्याणमधील नाना पावशे चौकात गोळीबार
रणजीत दुबे या तरुणाचा मृत्यू
जमिनीच्या वादातून भावाने गोळ्या झाडून हत्या केल्याचा संशय
कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
20/2/2025 16:27:22
धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान
या आजारामुळे सलग दोन मिनिटे बोलता येत नसल्याची धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया
20/2/2025 15:47:2
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर
15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
20/2/2025 15:36:54
कल्याण-डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमध्येय चाकू हल्ल्याची घटना
धक्का लागण्याच्या कारणावरून वाद झाल्याने चाकू हल्ला
19 वर्षीय तरुणाने 3 प्रवाशांवर केला चाकू हल्ला
20/2/2025 15:4:3
बीएमसी निवडणुका एप्रिल-मे मध्ये लागण्याची शक्यता – उद्धव ठाकरे
लढाई एकट्याची नाही, ही आपली लढाई
20/2/2025 14:51:49
स्वाभिमान संघटनेचं गोदावरी नदीपात्रात आमरण उपोषण
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी स्वाभिमानचं आंदोलन
20/2/2025 14:49:30
पुण्याच्या ससून रुग्णालयातील परिचाराकांचं आंदोलन
पदोन्नती व्हावी, रिक्त पदे भरावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन
मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा
20/2/2025 14:14:18
नाणेफेक जिंकत बांगलादेशची फलंदाजी
चॅम्पियन्स ट्रॉफीत आज भिडणार भारत – बांगलादेश
20/2/2025 14:12:37
निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार
शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची पहिली प्रतिक्रिया
20/2/2025 14:4:48
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर अपघात
गाडी पेटल्याने झाला अपघात, एकाचा मृत्यू
20/2/2025 13:51:28
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा
नाशिक जिल्हा न्यायालयाचा दणका
20/2/2025 13:14:33
झोपडपट्ट्यांमधील कचरा गोळा करण्यासंबंधीची निविदा महापालिकेकडून रद्द
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना काढली होती निविदा
20/2/2025 12:58:5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी
गोरेगाव पोलीस, मंत्रालय, जेजे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीकडून मेल
दिल्लीच्या 9 व्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी घेतली शपथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीला उपस्थित
दिल्लीच्या रामलीला मैदानात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहोळा
केंद्रीय मंत्री आणि भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री हजर
20/2/2025 12:22:3
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल
ऍट्रॉसिटी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल
20/2/2025 12:8:23
दादरमध्ये 10 कोटींचे ड्रग्ज जप्त, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, दोघांना अटक
20/2/2025 11:41:18
मध्य रेल्वे टिटवाळा – खडवली दरम्यान मालगाडी कपलिंग तुटले
डाऊन दिशेची वाहतूक पूर्णतः बंद
20/2/2025 10:22:36
कल्याणमध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू
नातेवाईकांनी गोळ्या झाडल्याचा संशय
20/2/2025 9:17:25
राज्यभरातील परिचारिकांचे एकदिवसीय काम बंद आंदोलन
20/2/2025 8:40:23
रायगड जिल्ह्यातील पेण, सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के; सर्वत्र भीतीचे वातावरण
पेणच्या तिलोरे, वरवणे तसेच सुधागड तालुक्यातील महागाव, भोपेची वाडी, देऊळ वाडी, कवेळी वाडी भागात हादरे
20/2/2025 8:28:33