“शिवालय”महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालयाचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन
नरिमन पॉईंट येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या “शिवालय” या महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले असून या महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी (5 डिसेंबर) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुपारी 12.15 होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला पक्षातील सर्व माननीय नेते मंडळी तसेच सचिव, उपसचिव, सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख उपस्थित राहणार.
शिवरायांच्या दूरदृष्टीने नौदल शक्तिशाली – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाला आत्मनिर्भर बनवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीचं मोठं काम – नारायण राणे
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यानंतर उपस्थितांसमोर बोलताना नारायण राणे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी नौदलाची निर्मिती करुन दूरदृष्टी दाखवून दिली होती. आजही आपला देश त्यांच्याच विचारांवर चालत आहे. मोदींनी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोठं काम केल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
पंतप्रधान मोदी तारकर्लीच्या दिशेने रवाना
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात दाखल
सिंधुदुर्गात आज पोलिसांचा चोख बंदोबस्त
मिझोराममध्ये 27 जागा जिंकत झोरम पिपल्स मुव्हमेंटने मिळवला विजय
सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटचा दारुण पराभव
मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात मनसे आक्रमक
इंग्रजी पाट्या मनसे पदाधिकाऱ्यांनी फोडल्या
मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे पदाधिकारी आणि व्यावसायिकांमध्ये झाला वाद
पुण्यात मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडले हॅन्डग्रेनेड
पुण्याच्या बाणेर परिसरातील घटना
आयशर कंपनीच्या आवारात सापडले
राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्य लक्ष्मण हाकेंनी दिला सदस्यत्वाचा राजीनामा
गेल्या दोन महिन्यात चार जणांनी वैयक्तिम वादामुळे दिले राजीनामे
लक्ष्मण हाके यांची नियुक्ती ही मविआच्या काळात करण्यात आली होती.
मध्य रेल्वेवरील वाशिंदकडून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली
धुळे-सीएसएमटी एक्सप्रेसचे इंजिन पडले बंद
तेलंगणा : काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला सुरुवात
बैठकीला काँग्रेसचे तेलंगणा प्रभारी माणिकराव ठाकरे, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार देखील उपस्थित
जळगावातील जामनेरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत
मनोज जरांगे यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी
विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेतील कामकाज स्थगित
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात
मिझोराममध्ये विधानसभेच्या 40 जागांच्या मतमोजणीला सुरुवात
आज ठरणार मिझोराम राज्याचे भवितव्य, मतमोजणीला 8 वाजता होणार सुरुवात
मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ
राज्यात 1984 पासून काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ)ची सरकार
मिझोराममधील विधानसभा निवडणुकीत जोरमथांगा आणि लालदुहोमा राज्यात दोन्ही नेत्यांकडून विजयाचे दावे
पंतप्रधान मोदी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात, नौदल दिनाच्या कार्यक्रमात राहणार उपस्थित
नौदल दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे होणार अनावरण
पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर नरेंद्र मोदी तारकर्ली इथं नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या प्रात्यक्षिकांना हजर राहणार
पंतप्रधान मोदी उपस्थितांना संबोधित करणार
नौदलाकडून नौदल दिनाच्या निमित्ताने प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या निमित्त मालवण तारकर्लीतल्या बाजारपेठ राहणार बंद
पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावर वाहतूक प्रतिबंध
सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पंतप्रधान मोदी हे सिंधुदुर्गात असतील
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर
आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याचा अंदाज
चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टी भागात दिसून येईल तामिळनाडू, चेन्नई आणि पुदुच्चेरीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज
महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास जोरदार पावसाच्या हजेरीची शक्यता
किनारी भागातील नागरिकांना आणि मच्छीमारांना अलर्ट जारी
चेन्नईमध्ये आज शाळांना सुट्टी