Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : मुख्यमंत्री पावसाळ्या आधीच्या कामांचा घेणार आढावा

Live Update : मुख्यमंत्री पावसाळ्या आधीच्या कामांचा घेणार आढावा

Subscribe

मुख्यमंत्री पावसाळ्या आधीच्या कामांचा घेणार आढावा

मुख्यमंत्री उद्या दुपारी मिठी नदीची पाहणी करणार


- Advertisement -

समीर वानखेडेंची सीबीआय चौकशी दिल्ली उच्च न्यायालयाने रोखली

मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे वानखेडेंना निर्देश

- Advertisement -

22 मे ला वानखेडे उच्च न्यायालयात मागणार दाद


जे. पी. नड्डा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार

रात्री 10 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार


आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची घेतली भेट

मुंबईतील भ्रष्ट रोड मेगा टेंडर रद्द करण्याची केली मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारात हस्तक्षेप करण्याची मागणी

कंत्राटदारांना अनावश्यक वाटली जाणारी 600 कोटी रुपयांची रक्कम रोखण्याची मागणी


हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे निधन

लंडनमध्ये घेतला वयाच्या 87 वर्षी अखेरचा श्वास


संजय राऊतांच्या चोरमंडळ वक्तव्याची विशेष अधिकार समिती करणार चौकशी

राज्यसभा सभापतींनी विशेष अधिकार समितीकडे प्रकरण पाठवले

संजय राऊत यांनी विधिमंडळाचा चोर मंडळ असा उल्लेख केला होता


सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे बैठकीचे सत्र सुरू

उद्या मुंबईतील विभाग क्रमांक 3 च्या पदाधिकाऱ्यांची बैठक

मातोश्रीवर उद्या 4 वाजता बैठक

दिंडोशी, गोरेगाव आणि जोगेश्वरीतील पदाधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थिती असणार


मुंबईत उद्या समीर वानखेडेंची सीबीआयकडून चौकशी

सुरक्षेच्या कारणास्तव चौकशीच्या जगेबाबत स्पष्टता नाही

आर्यन खान प्रकरणात वानखेडेंवर गुन्हा दाखल

सीबीआयने वानखेडेंना उद्या 11 वाजता चौकशीसाठी बोलावले


वसईत एक लाखांची लाच मागणारा पीएसआय ताब्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने घेतले ताब्यात


राष्ट्रवादीच्या बैठकीत महत्त्वाच्या नेत्यांकडे देण्यात आली जिल्हानिहाय जबाबदारी

कोकणाची जबाबदारी सुनील तटकरेंवर, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी एकनाथ खडसेंवर, ठाणे-पालघरची जबाबदारी जितेंद्र आव्हाडांवर, अनिल देशमुखांकडे नागपुरची जबाबदारी


भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबईत दाखल

जे. पी. नड्डा पुढील दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर


प्रशांत दामले घेणार शरद पवारांची भेट


सांगलीत रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अपघात

कार-ट्रॅक्टरच्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू


व्हाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला सुरूवात

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित


उदय सामंत घेणार शरद पवारांची भेट

आज दुपारी 3 वाजता भेट घेणार असल्याची माहिती


त्र्यंबकेश्वरमध्ये विविध हिंदु संघटना एकत्र

मंदिराच्या प्रवेशद्वाराचं करणार शुद्धीकरण

हिंदु महासंघाची जोरदार घोषणा


विधानसभा अध्यक्ष दोन्ही गटातील आमदारांना पाठविणार नोटीस

दोन्ही गटाकडून राजकीय पक्षाची घटना मागणार

पुढील 7 दिवसांत दोन्ही गटांना भूमिका मांडण्यास सांगणार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची कार्यवाहीला सुरुवात


कोल्हापूरात करणीच्या संशयातून शेजाऱ्याची हत्या


त्र्यंबकेश्वर प्रकरणी 4 उरूस आयोजकांवर गुन्हा दाखल

मंदिरात गेलो नसून मंदिराच्या बाहेरून धूप दाखवला असल्याचे उरूस आयोजकांचे मत


उद्धव ठाकरेंनी बोलावली जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक

12 वाजता शिवसेना भवनात होणार राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक


आमदारांना गंडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला अटक

आमदार विकास कुंभारे यांच्या तक्रारीनंतर भामट्याला अटक

मंत्रीपदाचा आमिष दाखवत केली पैशाची मागणी


भाजप कार्यकारिणीची उद्या पुण्यात बैठक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार बैठक

- Advertisment -