Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे...

Live Update : माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे दाखल

Subscribe

पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणारे पुण्यातील डीआरडीओचे बडतर्फ संचालक प्रदीप कुरूलकर यांना १५ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.


माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे दाखल

- Advertisement -

आदित्य ठाकरेंनी ही घेतले महाडेश्वरांच्या पार्थिवाचे दर्शन


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

- Advertisement -

भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनकडून देण्यात आली


बुकी अनिल जयसिंघानीच्या घरी ईडीचं पथक दाखल

अनिल जयसिंघानी सध्या गुजरात ईडीच्या ताब्यात

तपासणी करण्यासाठी जयसिंघानीच्या घरी ईडीचे पथक गेल्याची माहिती


दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून 2 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

ईडीच्या आरोप पत्राची कोर्टाने घेतली दखल


मध्य प्रदेशच्या खरगोनमधील अपघातात 15 जणांचा मृत्यू

50 फूट उंचावरून बस नदीत कोसळली

घटनास्थळी बचावकार्य सुरू


दरड कोसळल्याने परशूराम घाट वाहतुकीसाठी बंद

घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा

या घटनेनंतर वाहतूक लोटे-चिरणी-कळंबस्ते – चिपळूण या पर्यायी मार्गाने वळवली


राज्यातील शिक्षक भरती जुलै-ऑगस्टमध्ये होणार

15 मेनंतर पवित्र पोर्टल होणार अॅक्टिव


कर्मवीर भाऊराव पाटीलांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादीचे नेते साताऱ्यातील स्मृतीस्थळावर दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासहित अजित पवार आणि इतर महत्त्वाचे नेते स्मृतीस्थळावर दाखल


सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झेड. एस. पूनावाला यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कारवाई

पनामा पेपर प्रकरणात पूनावाला यांचे व्यवहार संशयास्पद आढळले होते

पूनावाला यांच्या मुंबईतील सीजे हाऊसमधील 41.64 कोटी रुपये किमतीच्या तीन स्थावर मालमत्ता ईडीकडून जप्त


मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

2017 ते 2019 दरम्यान विश्वनाथ महाडेश्वर यांनी भूषवले होते मुंबईचं महापौरपदॉ

विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते

महाडेश्वरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड इथल्या राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येईल.


जम्मू-काश्मिरमध्ये बर्फवृष्टी

अनंतनागमधील मार्गन टॉपमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत


पुण्यातील दिवेघाटात झालेल्या टँकर अपघातात दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात

अपघातात टँकर वाहनांना धडक देत दरीत कोसळला


नाशिकमध्ये उंटाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

या कारवाईत 43 उंट जप्त

प्राणी संरक्षक कायद्यांतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल

- Advertisment -