घरदेश-विदेशLIVE : मनोहर पर्रिकर यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

LIVE : मनोहर पर्रिकर यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

Subscribe

आज सायंकाळी पाच वाजता मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार केला जाणार आहे. पर्रिकर यांच्या जाण्याने देशातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले आहे. गेल्या एक वर्षापासून ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होते. ते ६३ वर्षाचे होते. रविवारी संध्याकाळी त्यांची कॅन्सर आजारासोबत सुरु असलेली झुंज संपली. गोव्याच्या दोनापौला येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोकाकूळ वातावरण आहे. पर्रिकर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, पर्रिकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तर गोवा सरकारने सात दिवसाचा दुखावटा जाहीर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -