Live Update: २४ तासांत राज्यात दगावले ४५५ कोरोनाबाधित, २०, ५९८ जणांना लागण!

News Live Update

मुंबईत दिवसभरात ५ हजार ०३८ रुग्ण झाले कोरोनातून बरे. राज्यापेक्षा मुंबईचा रिकव्हरी रेट जास्त! (वाचा सविस्तर)

corona update mumbai


गेल्या २४ तासांत राज्यात ४५५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून २० हजार ५९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, दुसरीकडे राज्यात २६ हजार ४०८ रुग्ण कोरोनातून बरे झाल्यामुळे राज्यातला कोरोना रिकव्हरी रेट ७३.१७ टक्के इतका झाला आहे. (वाचा सविस्तर)


गेल्या २४ तासांत राज्यात १९८ कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी आढळले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २१ हजार १५२वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत २१७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १७ हजार २९५ बाधित पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. पण आता त्या कोरोनामुक्त झाल्या असून त्यांना आज किंवा उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात देईल अशी माहिती समोर आली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्याच्या कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून त्यानंतर त्यांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे.


सलग दोन दिवसांपासून भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या २४ तासांत देशात ९४ हजार ६१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे भारतातील कोरोनामुक्त होण्याची संख्या ४३ लाख पार झाली आहे.


राज्यसभा उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.


१०६ वर्षीय वृद्ध महिलेने कोरोनावर मात केल्याचे समोर येत आहे. सावळाराम कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कोविड हॉस्पिटलमधून १०६ वर्षांच्या कोरोनाबाधित वृद्ध महिलेला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या वृद्ध महिलेचे नाव आनंदीबाई पाटील असे आहे.


केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर जेव्हा राज्यसभेत कृषीसंदर्भात दोन विधेयकांवर विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते, त्यावेळी अभूतपूर्व गोंधळ उडाला. यादरम्यान माइक तोडला आणि कागदपत्रे फाटली.


कृषी विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ सुरू आहे. विधेयकांविरोधात विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी होत आहेत.


मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाविरोधात मराठा समाजाच्या सदस्यांनी लालबाग परिसरात आंदोलन केले. आंदोलना दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.


कृषी विधेयके मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल आणि कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे सरकार देशाला आश्वासन देऊ शकेल का? या विधेयकावर चर्चा करण्यासाठी खास अधिवेशन बोलवावे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्यसभेत म्हणाले.


मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचं ठिय्या आंदोलन आहे. मुंबईत २० ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचं ठिय्या आंदोलन आहे.


कोरोनामुळे यंदा गणेश मुर्तीकारांना फटका बसला होता. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार म्हणाले की, ‘नवरात्रीला अवघे काही दिवस बाकी आहेत. राज्य सरकारला विनंती करुनही अद्याप देवीच्या मुर्तीची उंची आणि उत्सवाच्या नियमावली बाबत सरकार काहीच निर्णय घेत नसल्याने राज्यातील हजारो मुर्तीकार चिंतेत आहेत. अशाच विलंबाचा फटका गणेश मुर्तीकारांना बसला होता. जाग येवो अंबे, सरकारला जाग येवो!!’


देशात कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोनाबाधित रुग्ण रिकव्हर होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगातील कोरोनाच्या यादी भारत जरी कोरोनाबाधित संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असला तरी कोरोनामुक्त होण्याच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने कोरोनामुक्त होण्याच्या संख्येत अमेरिकेला देखील मागे टाकले आहे. गेल्या २४ तासांत देशात ९२ हजार ६०५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार १३३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ५४ लाख ६२०वर पोहोचली आहे. सविस्तर वाचा 


माजी मंत्री व भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुनगंटीवार यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.


देशात कालपर्यंत ६ कोटी ३६ लाख ६१ हजार ०६० इतक्या चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे. तर काल, १९ सप्टेंबर रोजी १२ लाख ०६ हजार ९०६ इतक्या चाचण्या झाल्या आहे.